Loading ...
/* Dont copy */

रिसर्च प्रपोजल राइटिंग कार्यशाळा २०२५ | एसएनडीटी पुणे

एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या सहकार्याने पुण्यात २१ ऑगस्ट २०२५ रोजी ‘रिसर्च प्रपोजल राइटिंग’ कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली.

रिसर्च प्रपोजल राइटिंग कार्यशाळा २०२५ | एसएनडीटी महिला विद्यापीठ पुणे

एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या सहकार्याने ‘पी एम उषा (MERU)’ अंतर्गत एक दिवसीय कार्यशाळा पुणे येथे संपन्न

रिसर्च प्रपोजल राइटिंग कार्यशाळा

मराठीमाती (मराठीमाती डॉट कॉम, संपादक मंडळ)

कार्यशाळा अहवाल


  • कार्यक्रमाचे नाव: ‘रिसर्च प्रपोजल राइटिंग’ विषयावरील एक दिवसीय कार्यशाळा
  • दिनांक: २१ ऑगस्ट २०२५
  • स्थळ: एस.एन.डी.टी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, पुणे
  • आयोजक: एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या साहाय्याने PMUSHA (पी. एम. उषा – मेरू) अंतर्गत

कार्यक्रमाचा आढावा


एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, मुंबई यांच्या साहाय्याने ‘रिसर्च प्रपोजल राइटिंग’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा पुण्यातील एस.एन.डी.टी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालयात दिनांक २१ ऑगस्ट २०२५ रोजी यशस्वीपणे आयोजित करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १० वाजता महाराष्ट्र गीतविद्यापीठ गीताने झाली. या कार्यशाळेस सिनेट सदस्य व वरिष्ठ प्राध्यापक डॉ. वीरेंद्र नगराळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

प्रमुख व्याख्याते


या कार्यशाळेत पुढील मान्यवर व्याख्यात्यांना आमंत्रित करण्यात आले होते :

  1. डॉ. वीरेंद्र नगराळे – सीनियर प्रोफेसर, एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, पुणे
  2. डॉ. माधवी कुलकर्णी – सीनियर रिसर्च फेलो, आय.सी.एस.एस.आर., नवी दिल्ली
  3. डॉ. चित्रा सोहनी – माजी प्राचार्य (इन्चार्ज), एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ, पुणे
  4. प्रो. डॉ. विलास जाधव – नॉलेज रिसोर्स सेंटर, पुणे

कार्यक्रमाची रुपरेषा


  • प्रास्ताविक व उद्दिष्टे मांडणी: प्राचार्य प्रो. डॉ. भरत व्हणकटे
  • प्रमुख पाहुण्यांची ओळख: कार्यशाळेच्या समन्वयक असोसिएट प्रोफेसर डॉ. राजेत्री कुलकर्णी
  • बीज भाषण: प्रो. डॉ. वीरेंद्र नगराळे यांनी समाजाभिमुख संशोधन, चिकाटी, संयम व सातत्याचे महत्त्व अधोरेखित केले.
  • सूत्रसंचालन: असोसिएट प्रोफेसर मेहेरआरती बडे
  • आभार प्रदर्शन: आयक्यूएसी समन्वयक प्रो. डॉ. अंजली कदम

कार्यशाळेची सांगता


कार्यशाळेचा समारोप संध्याकाळी प्रो. डॉ. वीरेंद्र नगराळे यांच्या अध्यक्षतेखाली झाला. सहभागी प्राध्यापक व संशोधन विद्यार्थिनींनी आपले अनुभव व्यक्त केले.

आयक्यूएसी समन्वयक प्रो. डॉ. अंजली कदम यांनी कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.

सहभाग


या कार्यशाळेत एकूण ५२ शिक्षक व संशोधन विद्यार्थिनींनी मुंबई, सातारा, कोल्हापूर व पुणे येथून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

अशा प्रकारे ही कार्यशाळा अत्यंत उत्साहात व यशस्वीपणे पार पडली.

एसएनडीटी पुणे यासंबंधी इतर बातम्या वाचा:

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची