Loading ...

एक वळसा - मराठी कविता (आरती प्रभू)

एक वळसा - मराठी कविता (आरती प्रभू) - ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी आरती प्रभू यांची एक वळसा ही लोकप्रिय मराठी कविता.

एक वळसा - मराठी कविता (आरती प्रभू)

एक इवलासा कुठलाही जीव, त्याचें रडणेकढणे... एक वळसा

एक वळसा

आरती प्रभू (चिंतामणी त्र्यंबक खानोलकर. ज्येष्ठ मराठी कवी आणि लेखक)

आरती प्रभू यांच्या ‘नक्षत्रांचे देणे’ या कवितासंग्रहातून.

एक इवलासा कुठलाही जीव, त्याचें रडणेकढणे, उसासे: हैं सगळे मिळून शेवटी काय? एखाद्या रमणीय गोष्टीतल्या कारंजासारखें स्वप्न त्या जीवाचें; पण एका इवल्याशा जीवाला हिशेबांत धरतोय का एक प्रचंड सागवानी राक्षस? त्याने हिशेबासाठी मोडलेल्या बोटाच्या नखावरील एक पांढरा शनी म्हणजेच तर नव्हे हा धाकला जीव? तरीही पुन्हा, पुनः पुन्हा, पानें फुटणें, पानें पिकणें, ती चक्रनेमिक्रमांत गळून पडणे, पुन्हा नवीन तवऱ्या फुटून हर्षखेदांची पुनरावृत्ति, दवांतले ओले ताटवे, शेजारून गेलेले हंगामी ओले पक्षी, रमणीचे ओले डोळे, हेसुद्धा एखाद्या नुक्त्याच भरायला आलेल्या कोवळ्या कोवळ्या आरशासारखेंच प्रसन्न पण कष्टी, मावळत्या ताऱ्यांचा संधिप्रकाश शोधणारे काचेच्या करवतीसारखे उंच निमुळते सूर, राक्षसच सर्व मिळून एक प्रचंड समुदाय; त्यांतील एक इवला जीव: इवल्या वेलीचा पुरातन वळसा, त्याचें रडणेकढणे, त्याचे उसासे. त्याचे लासलेले चंद्रकिरण, त्याच्या घराचें स्वतंत्र छप्पर, सर्व मिळूनसुद्धा तो पुन्हा इवलासाच त्याच्यासह, त्याच्यासह तो चालतोय वेलीच्या पुरातन वळशाच्या वळणावळणांनी नकळतच स्वतःच्या.

आरती प्रभू यांच्या इतर प्रसिद्ध कविता:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची