Loading ...

थांब तिथेच - मराठी कविता (अरुण म्हात्रे)

थांब तिथेच - मराठी कविता (अरुण म्हात्रे) - ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी अरुण म्हात्रे यांची लोकप्रिय मराठी कविता थांब तिथेच.

थांब तिथेच - मराठी कविता (अरुण म्हात्रे)

कधी कधी अस्तित्वाचा विचार असा साप बनून येतो अंगावर...

थांब तिथेच

अरुण म्हात्रे (अरुण जगन्नाथ म्हात्रे प्रसिद्ध कवी आणि गीतकार. मुंबई, महाराष्ट्र)

थांब तिथेच पाऊल नको उचलूस वळू नकोस हलू नकोस जाऊ दे वेळेचा अजगर शांतपणे मानेवरून छातीवरून कमरेतून वळसे घेत मांड्यातून पायापर्यंत... ढिम्म रहा एकदम चिडीचूप मेल्यासारखा निपचित... सरकू दे त्याला तू न आवडून ठाम रहा रस्त्याच्या कडेला कलंडलेल्या मैलाच्या दगडासारखा... कळू दे काळालाही तू मरणाआधीच मेला आहेस ते जाणू दे त्याला तू स्वतःच चालवतोस तुझा मृतदेह त्याला चकवून स्वतःच्या मिणमिणत्या काळोखात... चाचपीत चरा पडलेल्या तुझ्या एकाकी असलेपणाला... वळु नकोस हलू नकोस. असाच निपचित पडून रहा वेळेने तुला पूर्ण गिळेपर्यंत...

अरुण म्हात्रे यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची