Loading ...
/* Dont copy */

नाजूक नात्यांची वीण - मराठी कविता (उमा पाटील)

नाजूक नात्यांची वीण (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमच्या सभासद कवयित्री उमा पाटील यांची नाजूक नात्यांची वीण ही मराठी कविता.

नाजूक नात्यांची वीण - मराठी कविता (उमा पाटील)

नात्यांची वीण असते नाजूक, नात्यांना जपावे लागते खूप...

नाजूक नात्यांची वीण

उमा पाटील

नातेसंबंध... नात्यांची वीण असते नाजूक नात्यांना जपावे लागते खूप तुटेल इतके ताणू नयेत संबंध नेहमी जपावेत नात्यांचे बंध चूक जर झाली असेल दुसऱ्याकडून लगेच द्यावी माफी तुमच्याकडून जर तुम्ही चुकला असाल तर माफी मागावी खुशाल तेच रटाळ गाणे वाजवू नये नेहमीचे रडगाणे गावू नये करू नये भांडण तंटा नाहीतर वाजेल धोक्याची घंटा थोडे तुम्ही समजून घ्यावे थोडे त्याला समजू द्यावे कधी तुम्ही माघार घ्यावी कधी त्याने नमतं घ्यावं बोलू नये कधी खोटे नाहीतर होतील तुमचे तोटे खरं खरं सांगावं खरं खरं वागावं खऱ्यातच नात्यांचं खरेपण जपावं दुसऱ्याला टोचेल इतके बोलू नये अहंकारात माणुसकी तोलू नये मन मानेल असे वागू नये तोऱ्यातच जगणं जगू नये कधी आलाच राग तर ओकू नये आग रागाने तापवू नये डोकं नाहीतर रागीट म्हणतील लोकं होऊ नये नाराज, तोडू नये मने यालाच म्हणतात एकमेकांना जपणे नाराजी पचवावी, दुःख गिळावे नात्यांचे सुख प्रेमातच मिळावे मजेत राहावं आणि मजेतच जगावं अर्ध्या भरलेल्या पेल्याकडे बघावं प्रत्येकाची जिंदगी असते खास म्हणून माणसाने जगावे झकास

इतर मराठी कविता वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची