Loading ...

ती वसुंधरा - मराठी कविता (प्रशांतकुमार मोहिते)

ती वसुंधरा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी प्रशांतकुमार मोहिते यांची ती वसुंधरा ही मराठी कविता.

ती वसुंधरा - मराठी कविता (प्रशांतकुमार मोहिते)

दारात असते ती तुळस, मंदिरला असतो तो कळस...


ती वसुंधरा - मराठी कविता (प्रशांतकुमार मोहिते)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी ‘प्रशांतकुमार मोहिते’ यांची ‘ती वसुंधरा’ ही मराठी कविता.



दारात असते ती तुळस
मंदिरला असतो तो कळस
तुळशीपुढे झुकाव लागत
कळसासाठी मानेला थोडं तानावं लागतं

निवाऱ्यासाठी असते ती झोपडी
झोपडीच्या स्वप्नातून बनतो तो राजवाडा
झोपडीत जाताना नमाव लागतं
राजवाड्याला मात्र चढाव लागत

चेतन्यासाठी लागते ती ठिणगी
आगीचा होतो तो भडका
ठिणगीसाठी स्वतःच पेटावं लागतं
भडक्यात मात्र काहीही जळून जातं

थेंबा थेंबातून बनते ती नदी
या नद्याच बनवतात तो समुद्र
नदीला भटकत जावं लागतं तर
समुद्राला जाऊन भेटावं लागतं

दोन मनांच्या घरापर्यंत जाते ती वाट
दोन गावांच्या घरात जातो तो रस्ता
वाट मनामनाला घट्ट करते
रस्ता मात्र गावागावात अंतर ठेवतो

प्रारब्धाच्या अंधारात चमचमणारी ती चांदणी
प्रखरतेच्या प्रकाशात तळपणारा तो सूर्य
चांदण्याच्या प्रखरतेत शीतलताच जाणवते
सूर्य मात्र तळपत राहतो प्रखरतेने तसाच अविरत

ती लेखणी, तो पेन
ती चाळणी, तो पॅन
ती खुर्ची, तो टेबल
ती खिडकी, तो दरवाजा
ती कळशी, तो हंडा
ती चप्पल, तो शूज
ती लाज, तो माज
ती सूक्ष्म, तो भव्य
ती शिवाय घडतच नाही कोणतेच दिव्य

ती आहे म्हणून
मी, तू, तुम्ही, या, ह्या, ही आहे
या जगाला पेलणारी ती वसुंधरा आहे.

- प्रशांतकुमार मोहिते

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची