Loading ...
/* Dont copy */

नारीची श्रेष्ठता - मराठी कविता (निसर्ग चाटे)

नारीची श्रेष्ठता (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी निसर्ग चाटे यांची नारीची श्रेष्ठता ही मराठी कविता.

नारीची श्रेष्ठता - मराठी कविता (निसर्ग चाटे)

...तूच स्वराज्याची जिजाऊ


नारीची श्रेष्ठता - मराठी कविता (निसर्ग चाटे)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवीनिसर्ग चाटे’ यांची ‘नारीची श्रेष्ठता’ ही मराठी कविता.



कधी ताई, कधी बाई
कधी होते तू लेकराची आई
तूच स्वराज्याची जिजाऊ
तूच तर ज्ञानेशाची मुक्ताई
तूच शिवांबाची सई
तूच आहेस पुंडलिकाची विठाई...

तूच निर्मिले जग तुझ्या उदरी
पण अन्यायच आले सदैव तुझ्या पदरी
घडलो आम्ही धरून तुझा पदर
पण अजून नाही शिकलो करण्या तुझी कदर...

तूच जगाची अंबा
तूच तर रणांगणातील जगदंबा
तूच जन्मिले, सदैव केले अमुचे रक्षण
पण आम्ही करत आलो तुझ्याच इज्जतीचे भक्षण
आई... हे नाही आदर्श पुत्राचे लक्षण...

तूच सोसले, तूच भोगले
तूच निर्मिले, तूच तारीले या जगतासी
जगी नाही कुणी तुझ्या परी
नराहून सदैव श्रेष्ठ आहे एक नारी!

- निसर्ग चाटे

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची