Loading ...

ग्रीष्माची दाहकता (मराठी कविता)

ग्रीष्माची दाहकता (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी अमोल बारई यांची ग्रीष्माची दाहकता ही मराठी कविता (ग्रीष्म).

ग्रीष्माची दाहकता (मराठी कविता)

ग्रीष्माच्या मोसमातले कडाक्याचे उन्ह...


ग्रीष्माची दाहकता (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी ‘अमोल बारई’ यांची ‘ग्रीष्माची दाहकता’ ही मराठी कविता.



ग्रीष्माच्या मोसमातले कडाक्याचे उन्ह,
उन्हाच्या दाहकतेने शरीर होते सुन्न.

घामांच्या धारांमध्ये दिवस सारा सरतो,
सरतेशेवटी उद्याचा मनामध्ये धाक भरतो.

काम करण्याच्या इच्छा साऱ्या मरतात,
बुट्ट्या मारण्याची कारणे मनामध्ये भरतात.

पण,
गुलमोहर नेहमी उन्हातच बहरतो,
उन्हाच्याच दाहकतेत आंबाही मोहरतो.

पिंपळाच्या पानांची होते ग्रीष्मात गळती,
आणि फुटते त्यांना नवीन कोवळी पालवी.

हयांच्यापासून शिकावे जगायचे कसे ठाम,
उन्हामध्ये उभे राहून करावी त्यांच्या करडेपणावर मात.

निसर्ग सुद्धा नेहमी काहितरी शिकवितो,
झाडांच्या माध्यमातून आपल्याला दर्शवितो.

जीवनातही असतात कित्येक उन्हाळे, पावसाळे,
सुख दुःखाच्या रुपात कारणे असतात निरनिराळे.

जरी लागली गळती दुःखाच्या स्वरूपात,
नव्याने करावी जीवनाची सुरुवात.

- अमोल बारई

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची