Loading ...

आली आपली चाळीशी (मराठी कविता)

आली आपली चाळीशी (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी अमोल बारई यांची आली आपली चाळीशी ही मराठी कविता.

आली आपली चाळीशी (मराठी कविता)

गेले ते बालपण, तरुणपण सुद्धा ओसरले...


आली आपली चाळीशी (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉमचे सभासद कवी ‘अमोल बारई’ यांची ‘आली आपली चाळीशी’ ही मराठी कविता.



गेले ते बालपण
तरुणपण सुद्धा ओसरले,
आमच्या मित्र-मैत्रिणींना
बघा चाळीशीने घेरले.

बघता बघता आयुष्याची
शैक्षणिक वर्षे संपली,
घरादाराची जवाबदारी येऊन
कामाला सर्व जुंपली.

सकाळ झाली नाही की
कामावर जायची तयारी,
मुले बाळे घरोघरी
अक्षरशः घ्यावी लागते भरारी.

दिवसभर राबून राबून
लागतो दम सर्वांचा,
सायंकाळी घरी आल्यावर
भडिमार दिवसभराच्या कर्मांचा.

शरीराचे दुखणे खुपणे,
नाना व्याधींनी ग्रासले,
विविध रंगाच्या औषधांनी
आपले बेडरूम आहे सजले.

मुलांना बघून आजही
आपले बालपण आठवते,
काय मित्रांनो, काय म्हणता...
अधूनमधून आठवणींतून...
शालेय जीवन डोकावते?

म्हातारपणाकडे वाटचाल
आता आपली सुरू आहे,
चाळीशीनंतर आता खरी
परिवाराची भिस्त...
आपल्या खांद्यावर डोलत आहे.

- अमोल बारई

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची