Loading ...
/* Dont copy */

मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांत

मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांत [Marathipremi Palak Mahasammelan 2023 Karyakram Vruttant].

मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांत

मराठी अभ्यास केंद्र आणि अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने...


मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांत

(Marathipremi Palak Mahasammelan 2023 Karyakram Vruttant).मराठी अभ्यास केंद्र आणि अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच सहयोगी संस्था आणि सहभागी शाळा यांच्या एकत्रित प्रयत्नाने सुजाण आणि सजग पालकत्वासाठी ९ आणि १० डिसेंबर २०२३ रोजी नंदादीप विद्यालय, गोरेगाव (पूर्व) येथे मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ आयोजित करण्यात आले होते. दोन दिवस चाललेल्या यंदाच्या महासंमेलनाचे उद्घाटन ज्ञानपीठ विजेते ज्येष्ठ लेखक, कवी डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

अभिनेत्री चिन्मयी सुमीत या पालक महासंमेलनाच्या सदिच्छादूत असून दि शिक्षण मंडळ गोरेगाव, नूतन विद्यामंदिर, सन्मित्र मंडळ गोरेगाव, प्रबोधक यूथ फेडरेशन, मराठीमाती डॉट कॉम, मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत (फेसबूक समूह), श्री देवी अंबाबाई ट्रस्ट, अक्षरयात्रा वाचनालय अशा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था तसेच नंदादीप विद्यालय, आशाताई गव्हाणकर प्राथमिक शाळा, सन्मित्र मंडळ विद्यालय, अ भि गोरेगावकर इंग्लिश स्कूल, महाराष्ट्र विद्यालय इत्यादी शाळांनी एकत्रित येऊन हे पालक महासंमेलन यशस्वी करण्यात आपले योगदान दिले.

यंदाचे हे मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचे ५वे वर्ष. डी. एस. हायस्कूल, शीव येथे २३-२४ डिसेंबर २०१७ रोजी पहिले, महाराष्ट्र विद्यालय, गोरेगाव (प) येथे ८-९ डिसेंबर २०१८ रोजी दुसरे, आर एम भट हायस्कूल, परळ येथे १४-१५ डिसेंबर २०१९ रोजी तिसरे मराठीप्रेमी पालक महासंमेलन घेण्यात आले होते. तसेच कोरोना काळात १८ ते २१ डिसेंबर २०२० रोजी मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२० (ऑनलाइन) भरविण्यात आले होते.

मराठीप्रेमी पालक याचा अर्थ


मराठीप्रेमी पालक याचा अर्थ मराठी माध्यमात शिकलेले वा ज्यांचे पाल्य मराठी माध्यमात सध्या शिकत आहेत ते पालक तर आहेतच. पण ज्यांचे पाल्य इंग्रजी माध्यमात शिकत आहेत मात्र मराठी शाळांसाठी काहीतरी काम करण्याची इच्छा आहे अशा पालकांनाही आम्ही मराठीप्रेमी पालकच समजतो. सारांश, मराठी शाळांसाठी काम करणाऱ्या हरेक पालकाला आम्ही मराठीप्रेमीच समजतो. मराठी शाळांसाठी पालकांनी आग्रही भूमिका घेतल्यास आज दिसणारे मराठी शाळांचे चित्र बदलू शकते या अपेक्षेने हे मराठीप्रेमी पालक महासंमेलन घेण्यात येते. या संमेलनातून पालकांचे सक्षमीकरण होईल, त्यांना अधिकाधिक माहिती मिळत जाईल अशा प्रकारे त्याचे आयोजन केले जाते. थोडक्यात, हे संमेलन पालकांना केंद्रस्थानी ठेवून केले जाते.

मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व


मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व पटवून देणे, त्याचा प्रचार, प्रसार करणे. इंग्रजी भाषा शिकणे आणि इंग्रजी माध्यमात शिकणे या दोन स्वतंत्र गोष्टी आहेत, त्यातला फरक पालकांना समजावून सांगणे. प्रयोगशील शाळांच्या वेगवेगळ्या उपक्रमांचे आदान-प्रदान करणे, असे उपक्रम आपापल्या शाळांमध्ये राबवावे यासाठी पालकांनी आग्रही राहणे. तसेच मराठी शाळांमध्ये शिकणाऱ्या पाल्यांच्या पालकांचे संघटन करणे. या चार मुख्य उद्देशांना डोळ्यासमोर ठेवून मराठीप्रेमी पालक महासंमेलन भरवले जाते.

प्रयोगशील उपक्रम आणि ग्रंथप्रदर्शन


यंदाच्या पालक संमेलनातील प्रयोगशील उपक्रम आणि ग्रंथप्रदर्शन दालनाला शिक्षण क्षेत्रातला चळवळ्या कार्यकर्ता सुबोध केंभावी यांचे नाव देण्यात आले होते. ग्राममंगल पुणे, आनंदनिकेतन नाशिक, कुमुद विद्यामंदिर, नंदादीप विद्यालय, आशाताई गव्हाणकर प्राथमिक शाळा, सन्मित्र मंडळ विद्यालय, अ भि गोरेगावकर इंग्लिश स्कूल या शाळांनी तसेच नवनिर्मिती फाऊंडेशन यांनी प्रयोगशील उपक्रमाची दालने लावली होती. तसेच ज्योत्स्ना प्रकाशन, रोहन प्रकाशन, राजा प्रकाशन, लोकवाड्मय प्रकाशन, यश एजन्सी यांनी शालोपयोगी साहित्याचे प्रदर्शन मांडले होते. अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या अभिनव महोत्सवाचे तसेच सुबोध केंभावी प्रयोगशील उपक्रम आणि ग्रंथप्रदर्शन दालनाचे डॉ. भालचंद्र नेमाडे यांच्या हस्ते उद्घाटन करून मराठीप्रेमी पालक महासंमेलनाची सुरुवात करण्यात आली.

आपण अजूनही इंग्रजीचे गुलाम असल्यासारखे खाटीकखान्यात गुरांना पाठवावे, तसे मुलांना रिक्षा, बसमध्ये कोंबून इंग्रजी शाळांमध्ये पाठवत आहोत. या इंग्रजी शाळांमध्ये मुलांना पाठवून तुम्ही मुलांचा कोंडमारा करत आहात, मुलांना मराठी माध्यमाच्या शाळांमधून नैसर्गिकपणे शिकू द्या, असे आवाहन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी आपल्या उद्घाटनाच्या भाषणात केले. सामाजिक कार्य करणाऱ्यांना आर्थिक चणचण भासू नये यासाठी डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांनी जसा सामाजिक कृतज्ञता निधी उभारला तसाच मराठी शाळांच्या सक्षमीकरणासाठी मराठी शाळा कृतज्ञता निधी उभारणं आवश्यक असल्याचे मत अभिनेत्री आणि मराठी शाळांच्या सदिच्छादूत चिन्मयी सुमीत यांनी मांडले.

राज्य शिक्षण मंडळांचे महत्त्व कमी होत असून अभ्यासक्रम सोपा करणे हे त्याचे एक कारण आहे. त्यामुळे मराठी शाळा स्पर्धेत टिकण्यासाठी अभ्यासक्रमाच्या दर्जाकडे लक्ष देणे आवश्यक आहे, असे आपल्या अध्यक्षीय भाषणात अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत केळकर यांनी मत मांडले.

मराठी माध्यमात शिकून आपल्या पाल्याचे करीयर होईल का अशी भीती अधिक शंका पालकांच्या मनात असते. ती दूर करण्यासाठी मराठी शाळांमध्ये शिकून करीयरच्या चांगल्या टप्प्यावर असलेल्या यशवंतांशी संवाद हे सत्र प्रत्येक पालक महासंमेलनात घेतले जाते. इंग्रजी पत्रकारीता करणारा पार्थ एम एन, सनदी लेखापाल निती अहिवळे, इलेक्ट्रीकल अभियंता सुजीत चिराटे, शारीरक शिक्षणात पीएचडी मिळवलेले डॉ. आदित्य कुलकर्णी, कबड्डी खेळात शिवछत्रपती पुरस्कार मिळवलेली कोमल देवकर, TISS मध्ये प्राध्यापकी करीत असलेल्या सई ठाकूर, भौतिकशास्त्रात संशोधन करणारा चैतन्य परांजपे आणि TIFR मध्ये संशोधक म्हणून काम करणारा सुजय माटे अशी विविध क्षेत्राततील तरूण यशवंतांनी उपस्थित पालकांशी संवाद साधला.

त्या सर्वांच्या बोलण्यातून एकच गोष्ट पोचत होती ती म्हणजे मराठी माध्यमात शिकूनही उत्तम करीयर करता येते, विविध क्षेत्रात करता येते, अडचणी येतात पण त्या केवळ मराठी माध्यमात शिकल्यात म्हणून येत नाहीत तर त्या अडचणींवर मात करताना मराठी माध्यमात शिकल्याचा फायदाच होतो. शिवाय मराठी माध्यमात शिकल्यामुळे शाळेतून मिळणारे संस्कार, संस्कृतीशी जोडून असलेली नाळ, साहित्याशी होणारी ओळख याचा दीर्घकाळ आपल्या व्यक्तित्वार प्रभाव राहतो.

शाळा माध्यमाची निवड


शाळा माध्यमाची निवड – पाल्य आणि पालक मनोगत या सत्रात मिथिलेश पाटणकर यांनी सांगितले की विदितला मराठी माध्यमाच्या शाळेत घालावे की इंग्रजी असा काही पेच आपल्यासमोर नव्हता. कारण संगीतासारख्या कलेच्या क्षेत्रात काम करताना मातृभाषेतील शिक्षणाचे फायदे काय असतात हे अनुभवाने माहित होते. त्यामुळे त्याला मराठी शाळेत घालण्याचा आपण घेतलेला निर्णय योग्यच होता आणि त्याने केलेली प्रगती पाहता ते सिद्धही झाले. स्वतः विदितनेही मराठी शाळेत शिकल्यामुळे आपले कोणतेही नुकसान झाले नाही, उलट त्याचे कलेच्या क्षेत्रात वाटचाल करताना फायदेच झाल्याचे सांगितले.

शरद कदम हे समाजवादी चळवळीत घडलेले बॅंक अधिकारी, वाचनाचे संस्कार, मातृभाषेतील शिक्षणावर ठाम विश्वास. स्वतः ज्या काळात शिकले त्या काळात मराठी की इंग्रजी अशी माध्यमांची स्पर्धा नव्हती. पण मुलासाठी शाळा निवडताना इतरांचा सल्ला इंग्रजी माध्यमाचा होता. पण कटाक्षाने मुलाला मराठी माध्यमात टाकले. त्याला चांगले इंग्रजी येईल यासाठी प्रयत्न केले. वाचनाचे संस्कार केले. आज तो परदेशी असून मराठीत शिकल्यामुळे त्याचे काहीही अडले नाही.

स्नेहल सुद्रीक यांचा अनुभव आंधळेपणाने मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवणाऱ्या पालकांसाठी विचार करायला लावणारा आहे. त्यांनी लोकरूढीला अनुसरून मुलाला इंग्रजी शाळेत घातले. पण त्यांना मुलाच्या शिक्षणाबाबत शाळेचा जो अनुभव आला तो विदारक होता. मुलगा अभ्यासात प्रगती करीत नाही, तो गतिमंद वाटतो अशी तक्रार करत त्याला दुसऱ्या शाळेत घालावे म्हणून शाळेने तगादा लावला. मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेतला तेव्हा त्यांनी सांगितले की मुलगा नॉर्मल आहे. पण त्याची इंग्रजी शाळा त्याच्या शिक्षणासाठी सहकार्य करायला तयार नसल्याने नाइलाजाने त्याला मराठी शाळेत घालावे लागले. मराठी शाळेने मात्र त्याच्या निकोप वाढीसाठी सर्व ते प्रयत्न केले आणि चमत्कार वाटावा अशी त्याची प्रगती होत गेली.

अभ्यासात मागे पडलेला, अभिव्यक्ती खुंटलेला मुलगा नैसर्गिकरीत्या उलगडू लागला. परीक्षांमध्येही चांगले यश मिळवू लागला. अजित वर्तक हे नोकरीसाठी परदेशी राहिलेले पालक. मुलगा तिथे इंग्रजी माध्यमात शिकत होता. पण मधल्या काळात काही वर्षे भारतात यावे लागले. तेव्हा मराठी माध्यमात घातले. पुन्हा परदेशात जावे लागल्याने पुन्हा इंग्रजी माध्यमात मुलाला इंग्रजी शिकावे लागले. पण मुलाने दोन्ही भाषा उत्तम आत्मसात केल्या.

मातृभाषेतून शिक्षण


मातृभाषेतून शिक्षण हा एक भावनिक मुद्दा नसून त्याला मानसिक, सामाजिक, आर्थिक अशा विविध अंगांनी शास्त्रीय आधार कसा आहे हे पालकांसमोर मांडण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ डॉ.अरूण नाईक, व्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञ विजय पाटकर आणि मुख्याध्यापिका पल्लवी पराडकर यांना निमंत्रित करण्यात आले होते. डॉ अरूण नाईक यांनी मातृभाषेचा मुलांच्या अभिव्यक्तीशी व सर्जनशीलतेशी असलेला संबंध संशोधनाच्या अंगाने स्पष्ट केला तर पल्लवी पराडकर यांनी त्यांच्या शाळेमध्ये लहान मुलांशी साधलेल्या संवादाचे दाखले देऊन मुलांच्या जडणघडणीत त्यांना समजणारी भाषा कशी कार्य करते हे सांगितले. व्यवस्थापन तज्ज्ञ विजय पाटकर यांनी मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटीच्या मराठी शाळांची उदाहरणे देऊन मराठी मातृभाषेतूनही कसे चांगले शिक्षण देता येऊ शकते याचे स्वानुभव सांगितले.

शासनाने अलीकडेच घोषित केलेल्या मराठी शाळांच्या समूह आणि दत्तक योजनांचा समर्थन आणि विरोध अशा दोन्ही अंगांनी विचार मांडणारे एक सत्र या पालक महासंमेलनात घेण्यात आले होते. ह्या दोन्ही योजनांमागील शासनाची भूमिका काय आहे आणि ती मराठी शाळांच्या कशी हिताची आहे हे राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षणच्या डॉ. नेहा बेलसरे यांनी सविस्तरपणे सांगितले. तर ह्या दोन्ही योजना कशा शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करणाऱ्या तसेच शिक्षणाच्या खाजगीकरणाला चालना देणाऱ्या आहेत हे गीता महाशब्दे यांनी स्पष्ट केले. कमी पटसंख्येच्या मराठी शाळा बंद करण्याचा किंवा शिक्षक कपात करण्याचा शासनाचा अजिबात विचार नसून परिसरातील कमी पटसंख्येच्या पंधरा शाळांचे एकत्रीकरण करून शिक्षणाची गुणवत्ता वाढवणे तसेच सामाजिकीकरणापासून वंचित राहणाऱ्या मुलांवर सामाजिकतेचे संस्कार करणे असा प्रामाणिक हेतू त्यामागे आहे असे डॉ. नेहा बेलसरे यांचे म्हणणे होते.

दत्तक योजनेमुळे मराठी शाळांना चांगल्या पायाभूत सुविधा मिळणार आहेत. दत्तक योजनेबाबत शासनाने काढलेल्या शासन निर्णयात भूमिका स्पष्ट करण्यात आली असून ज्या कार्पोरेट कंपन्या शाळा दत्तक घेतील त्यांना शाळांचा मालकी हक्कही मिळणार नाही आणि शाळेच्या दैनंदिन कामकाजात हस्तक्षेपही करता येणार नाही. शिक्षण चळवळीतील एक अभ्यासू कार्यकर्त्या असलेल्या गीता महाशब्दे यांनी शासनाच्या या दोन्ही योजनांची सप्रमाण चिरफाड करून शासनाचे सर्व दावे खोडून काढले. आपल्या प्रतिपादनात शिक्षण हक्क कायद्याचा परिचय करून देत महाशब्दे यांनी ह्या दोन्ही योजना त्यातील तरतुदींच्या कशा विरोधी आहेत आणि शासनाने आपली जबाबदारी झटकून शिक्षण क्षेत्रात नफेखोर कार्पोरेट जगताला प्रवेश दिला तर त्याचे काय प्रकारचे दुष्परिणाम संभवतात याची मांडणी केली. ह्या दोन्ही योजना शासनाने ताबडतोब मागे घेतल्या पाहिजेत कारण त्यामुळे ना शाळांची गुणवत्ता वाढणार आहे ना कमी संख्येने शिकणाऱ्या मुलांचा फायदा होणार आहे. उलट त्यांच्या अडचणीच वाढणार आहेत.

मराठी शाळांसाठी आपण काय केले पाहिजे?


मराठी शाळांसाठी आपण काय केले पाहिजे अशा प्रकारचा प्रश्न राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींना दर पालक महासंमेलनातून विचारला जातो आणि मराठी शाळांसाठी हे राजकीय पक्ष काय करणार आहेत त्याची स्पष्ट भूमिका त्यांनी मांडावी हा त्या मागचा उद्देश असतो. मात्र यंदाच्या पालक महासंमेलनात स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. मराठी शाळांमधील विद्यार्थीसंख्या वाढावी म्हणून स्वखर्चाने चालवणाऱ्या आणि अकोले तालुक्यातील हरेक गावात मराठी शाळांची माहिती पोचविणाऱ्या शिक्षकांचा ‘आपली शाळा मराठी शाळा’ हा उपक्रम सांगण्यासाठी भाऊसाहेब चासकर आले होते.

मराठी शाळेत शिकले म्हणून मुंबई महानगरपालिकेने शिक्षकाची नोकरी नाकारलेल्या उमेदवारांसाठी प्रसंगी रस्त्यावरची लढाई लढून त्यांना त्यांचा हक्क मिळवून देणारा मराठी एकीकरण समितीचा मुंबई शहर अध्यक्ष सचिन दाभोळकर, मराठी पाट्यांसाठी आग्रही असलेल्या मराठी बोला चळवळीचा शिलेदार मंदार चौगुले, दीड लाखाहून अधिक सदस्यसंख्या असलेल्या मराठी शाळा आपण टिकवल्या पाहिजेत या फेसबूक समूहाचा प्रवर्तक प्रसाद गोखले आणि मराठी शाळांच्या बृहद्आराखड्यासाठी न्यायालयीन लढाई लढणारे ‘आम्ही शिक्षक’चे सुशील शेजुळे असे मराठी शाळा आणि त्यासाठी आग्रहाने लढू पाहणाऱ्या तरूण कार्यकर्त्यांनी आपले अनुभव मांडले. सर्वपक्षीय राजकीय वर्गाची एकूणच मराठी शाळांबाबत असलेली अनास्था, बेपर्वाई आणि शासकीय-प्रशासकीय वर्गाकडून मराठी शाळांना मिळणारा दुजाभाव, सापत्न वागणूक याचे असंख्य दाखले या मंडळींनी दिले.

प्रयोगशील शाळांचे उपक्रम


प्रयोगशील शाळांच्या उपक्रमाचे सादरीकरण या सत्रात ग्राममंगल (पुणे), आनंद निकेतन (नाशिक) या मुंबई बाहेरील शाळांनी आपले सादरीकरण केले. तर मुंबईतील कुमुद विद्यामंदिर, अमरकोर विद्यालय, अ. भि. गोरेगावकर इंग्लिश स्कूल, सन्मित्र विद्यालय आणि नंदादीप विद्यालय या शाळांनी आपले सादरीकरण केले. ज्ञानरचनावाद, मेंदूआधारीत शिक्षण, कृतीयुक्त शिक्षण, प्रकल्प पध्ती आणि लर्नींग होम यावर आधारीत उपक्रमांची माहिती ग्राममंगल शाळेने दिली. शाळेत प्रत्येक विषय शिकवताना मुलांचे अनुभव, चर्चा, निरीक्षण, गटकाम, क्षेत्रभेटी यांचा वापर केला जातो, अशी माहिती आनंदनिकेतन शाळेने दिली.

सोबतच स्वयंपाक, उद्योजकता विकास, लैंगिक शिक्षण दिले जाते आणि सामाजिक जाणिवेचा विकास व्हावा याकरीता रिमांडहोममधील मुले, बहुविकलांग शाळेतील मुले, बालकामगार, अंध, कर्णबधीर शाळेतील मुले, शेतकरी, घंटागाडी कामगार अशा सर्वांशी भेटी, मुलाखती शाळेत आयोजित केल्या जात असल्याचे आनंदनिकेतन शाळेने सांगितले. कुमुद विद्यामंदिर शाळेने विद्यार्थी केंद्रीत शिक्षणाकरीता कृतीयुक्त शिक्षणावर भर (गोष्टीचा तास, उमलती काव्यप्रतिभा, storytelling, गणित कोडी, विज्ञान खेळणी, कार्यानुभव अंतर्गत विविध प्रकारच्या कार्यशाळा), बोलक्या भिंती (शैक्षणिक साहित्याचा वापर), खेळातून शिक्षणाकडे संकल्पनेचा वापर, शालेय यशाची गुढी, स्नेहसंमेलनाऐवजी कलादालनातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव दिला जातो. थोडक्यात, आपापल्या शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रमांची माहिती पालकांना देण्यात आली.

मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचा समारोप


मराठीप्रेमी पालक महासंमेलनाचा समारोप सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या अध्यक्षतेखाली आणि MKCL चे प्रमुख मार्गदर्शक विवेक सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. कोठारी आयोगापासून ते आत्ताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक शिक्षण मातृभाषेतून देण्याचे सुचविण्यात आले आहे. पण इंग्रजी माध्यमात शिकले म्हणजे स्टेटस ही पालकांची भावना आहे. त्यामुळे मराठी शाळा मागे पडत आहेत, ही परिस्थिती कठीण आहे, अशीच राहणार आहे, हे लक्षात घेऊन मराठी अभ्यास केंद्राने मराठी शाळा आणि भाषेसाठीचा लढा सुरुच ठेवावा, त्यामुळे मराठी शाळांची दुरावस्था कमी होईल, असा विश्वास हेमंत गोखले यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केला.

जगात केवळ ६ टक्के लोकांना इंग्रजी भाषा येते. कुठलेही ज्ञान, कौशल्य, सुसंकृत व्यक्तिमत्व म्हणजे अभिजन असे नाही तर अस्खलित इंग्रजी येणे म्हणजे अभिजन हा समज समाजात शासकीय धोरणांप्साबन सगळीकडे पसरला आङे. त्यामुळे आपण इंग्रजीचे मांडलिकत्व स्विकारले आहे. अभिजनत्वाची व्याख्या बदलणे हा संघर्ष आहे. सर्वसामान्य समाजाला इंग्रजी येणे हीच मुलाच्या प्रगतीची वाट आहेस असे पालकांना वाटत असेल तर मराठी शाळांनी उच्च दर्जाचे इंग्रजी शिकवावे, असे मत विवेक सावंत यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र शासन आणि मराठी शाळा


महाराष्ट्र शासनाने मराठी शाळांच्या सद्यस्थितीबाबत लवकरात लवकर श्वेतपत्रिका प्रसिद्ध करावी. राज्यातील शालेय शिक्षणाचे माध्यमविषयक धोरण विनाविलंब जाहीर करावे. तसे फलक प्रत्येक शाळेच्या दर्शनी भागात लावणे संस्थाचालकांवर बंधनकारक करावे. प्रतिवर्षी राज्यातील किमान एका प्रयोगशील व गुणवत्तापूर्ण मराठी शाळेला पुरस्कार देऊन सन्मानित करावे. पटसंख्येचे कारण देऊन मराठी शाळा बंद करणे किंवा त्यांचे इंग्रजी माध्यमात रूपांतर करण्याऐवजी त्यामागील कारणांचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करावी.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मराठी माध्यमाच्या शाळांचे सक्षमीकरण करण्यासाठी कृतिआराखडा तयार करावा. शाळांचे राज्य स्तरावरील माध्यमविषयक धोरण स्थानिक स्वराज्य संस्थांना बंधनकारक करावे. मराठी शाळांच्या समूह आणि दत्तक योजनांचा शासन निर्णय मागे घ्यावा. मराठी राज्यात अनुदान देऊन मराठी शाळा चालवणे ही राज्य शासनाची जबाबदारी असून शासनाने ती पार पाडावी.

मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता व्यावसायिक पाठ्यक्रमांत राखीव जागा ठेवणे यासारख्या विशेष प्रोत्साहनपर योजना राबवणे आणि शासकीय नोकरीसाठी समान पात्रताधारक उमेदवारांमधून उमेदवार निवडताना मराठी माध्यमात शिकलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जावे. असे जवळपास दहा ठराव या पालक महासंमेलनात मांडण्यात आले. अशाप्रकारचे ठराव दर पालक महासंमेलनात मांडण्यात येतात, सर्व राजकीय पक्षांना दिले जातात. मात्र मराठी शाळांच्या मुद्यांवर पालक एकत्रितपणे राजकीय पक्षांना जाब विचारत नाहीत, मराठी शाळा हा राजकीय पक्षांच्या जाहिरनाम्याचा, निवडणूकीचा मुद्दा होत नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या ठरावांची अंमलबजावणी होत नाही, असे निरीक्षण समारोपाच्या सत्रात नोंदविण्यात आले.

येत्या काळातील संमेलन


येत्या काळात अशाप्रकारच्या संमेलनांची गरज अधिकाधिक लागणार आहे. कारण मराठी शाळांबाबत सर्वांगाने विचार करण्याचे सार्वजनिक मंच आता फारच थोडे उरले आहेत. मातृभाषेतील शिक्षण, मराठी शाळा हा केवळ समाजातल्या शेवटच्या स्तरातील पालक यांच्यापुरताच विषय राहिला आहे, अशा अवस्थेकडे एकूणच मराठी समाज वेगाने चालला आहे. त्याला कारणही तसंच आहे. समाजातील बोलक्या वर्गाने उन्नतीचे सगळे मार्ग इंग्रजी शाळांभोवती जोडून ठेवले आहेत कारण मराठी शाळांमध्ये आनी पानी बोलणाऱ्या पालकांचे पाल्य येऊ लागले आहेत. त्याचे वाईट परिणाम आपल्या पाल्यांवर होतील अशी भीती या बोलक्या वर्गाला वाटते. शिवाय इंग्रजी हीच केवळ ज्ञानाची एकमेव भाषा आहे, इंग्रजी माध्यमातून शिकले तरच आपल्या पाल्याचा विकास होईल अशी त्यांची पक्की समजूत आहे.

या वर्गाचा समाजावर असलेला प्रभाव पाहता शासकीय-प्रशासकीय धोरणेही या बोलक्या वर्गाचे हित लक्षात ठेवूनच ठरवली जात आहेत. त्यासाठी स्वत:च्याच राज्याची शैक्षणिक मंडळे, महापालिका शाळा मोडीत काढून सीबीएसई, आयसीएसई, आयबी अशा मंडळांना राज्यात पायघड्या घातल्या जात आहेत. प्रसारमाध्यमांनाही फक्त मराठी शाळांच्याच गुणवत्तेबद्दल प्रश्न पडतात, इंग्रजी शाळा म्हणजे गुणवत्तापूर्णच असतात याबद्दल त्यांच्या मनात कोणतीही शंका नसते. मराठी शाळांमध्ये चालणाऱ्या असंख्य प्रयोगशील उपक्रमांची नोंद घ्यावी, त्याची माहिती सर्वदूर मराठी समाजापर्यंत पोचवावी, मातृभाषेतील शिक्षणाचे महत्व सांगावे असे प्रसारमाध्यमांना वाटत नाही. त्यामुळे मराठी शाळा बंद पडल्या, पडताहेत याबद्दल शासन-प्रशासनाला जाब विचारणे तर फारच लांब राहिले.

गुणवत्तापूर्ण मराठी शाळांसाठी पालकांनी आग्रही भूमिका घ्यायला हवी, पालकांचे सक्षमीकरण करायला हवे याकरता मराठीप्रेमी पालक महासंमेलनाच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. मात्र प्रतिष्ठेच्या नावाखाली, इंग्रजी भाषेच्या अवास्तव दडपणाखाली, इंग्रजी शाळांच्या चकचकीतपणाला भूलून त्या इंग्रजी शाळांकडे धावणारे पालक शिक्षण घेण्याच्या प्रक्रियेतील आपल्या पाल्याचे नैसर्गिकरीत्या शिकणं, आनंददायी शिकणं गमावून फक्त घोकंमपट्टी करणारी, बुजरी, अबोल पिढी आपण घडवतो आहोत याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत. मराठीप्रेमी पालकांनी याचा अजूनही डोळसपणे विचार केला नाही तर येत्या काळात त्यांच्या पाल्यांसोबतच एकूण मराठी समाजालाही त्याच्या गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल एवढे मात्र निश्चित!

मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांतमराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांतमराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांतमराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांतमराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांतमराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांतमराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांतमराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांतमराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांतमराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांतमराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांत

- आनंद भंडारे
(समन्वयक, मराठीप्रेमी पालक महासंमेलन / कार्यवाह, मराठी अभ्यास केंद्र)

अभिप्राय

माझा बाप्पा
माझा बाप्पा (मातीतून घडविलेल्या आपल्या पर्यावरणपूरक बाप्पाची छायाचित्रे)
नाव

अ रा कुलकर्णी,1,अ ल खाडे,2,अ ज्ञा पुराणिक,1,अंकित भास्कर,1,अंजली भाबट-जाधव,1,अंधश्रद्धेच्या कविता,5,अकोला,1,अजय दिवटे,1,अजित पाटणकर,18,अनंत दळवी,1,अनंत फंदी,1,अनंत भावे,1,अनिकेत येमेकर,2,अनिकेत शिंदे,1,अनिल गोसावी,2,अनिल भारती,1,अनिल वल्टे,5,अनुभव कथन,19,अनुरथ गोरे,1,अनुराधा पाटील,1,अनुराधा फाटक,39,अनुवादित कविता,1,अपर्णा तांबे,7,अब्राहम लिंकन,2,अभंग,6,अभिजित गायकवाड,1,अभिजीत टिळक,2,अभिव्यक्ती,1360,अभिषेक कातकडे,4,अमन मुंजेकर,7,अमरश्री वाघ,2,अमरावती,1,अमित पडळकर,4,अमित पवार,1,अमित बाविस्कर,3,अमित सुतार,1,अमुक-धमुक,1,अमृत जोशी,1,अमृता शेठ,1,अमोल कोल्हे,1,अमोल तांबे,1,अमोल देशमुख,1,अमोल बारई,6,अमोल वाघमारे,1,अमोल सराफ,2,अरविंद जामखेडकर,1,अरविंद थगनारे,5,अरुण कोलटकर,1,अर्चना कुळकर्णी,1,अर्चना डुबल,2,अर्जुन फड,3,अर्थनीति,3,अल्केश जाधव,1,अविनाश धर्माधिकारी,2,अशोक थोरात,1,अशोक रानडे,1,अश्विनी तातेकर-देशपांडे,1,अश्विनी तासगांवकर,2,अस्मिता मेश्राम-काणेकर,7,अहमदनगर,1,अक्षय वाटवे,1,अक्षरमंच,1100,आईच्या कविता,29,आईस्क्रीम,3,आकाश पवार,2,आकाश भुरसे,8,आज,6,आजीच्या कविता,1,आठवणींच्या कविता,18,आतले-बाहेरचे,3,आतिश कविता लक्ष्मण,1,आत्मविश्वासाच्या कविता,14,आदर्श कामिरे,1,आदित्य कदम,1,आदेश ताजणे,8,आनंद दांदळे,8,आनंद प्रभु,1,आनंदाच्या कविता,26,आमट्या सार कढी,18,आर समीर,1,आरती गांगण,2,आरती शिंदे,4,आरत्या,82,आरोग्य,21,आशा गवाणकर,1,आशिष खरात-पाटील,1,आशिष चोले,1,इंदिरा गांधी,1,इंदिरा संत,6,इंद्रजित नाझरे,26,इंद्रजीत भालेराव,1,इतिहास,251,इलाही जमादार,1,इसापनीती कथा,48,उत्तम कोळगावकर,2,उदय दुदवडकर,1,उन्मेष इनामदार,1,उपवासाचे पदार्थ,15,उमेश कानतोडे,1,उमेश कुंभार,14,उमेश चौधरी,1,उस्मानाबाद,1,ऋग्वेदा विश्वासराव,5,ऋचा पिंपळसकर,10,ऋचा मुळे,18,ऋषिकेश शिरनाथ,2,ऋषीकेश कालोकार,2,ए श्री मोरवंचीकर,1,एच एन फडणीस,1,एप्रिल,30,एम व्ही नामजोशी,1,एहतेशाम देशमुख,2,ऐतिहासिक स्थळे,1,ऑक्टोबर,31,ऑगस्ट,31,ऑडिओ कविता,15,ऑडिओ बुक,1,ओंकार चिटणीस,1,ओम ढाके,8,ओमकार खापे,1,ओशो,1,औरंगाबाद,1,कपिल घोलप,13,करण विधाते,1,करमणूक,71,कर्क मुलांची नावे,1,कल्याण इनामदार,1,कविता शिंगोटे,1,कवितासंग्रह,279,कवी अनिल,1,कवी ग्रेस,4,कवी बी,1,काजल पवार,1,कार्यक्रम,12,कार्ल खंडाळावाला,1,कालिंदी कवी,2,काशिराम खरडे,1,कि का चौधरी,1,किरण कामंत,1,किल्ले,97,किल्ल्यांचे फोटो,5,किशोर चलाख,6,किशोर पवार,1,कुठेतरी-काहीतरी,3,कुणाल खाडे,3,कुणाल लोंढे,1,कुसुमाग्रज,10,कृष्णकेशव,1,कृष्णाच्या आरत्या,5,के के दाते,1,के तुषार,8,के नारखेडे,2,केदार कुबडे,40,केदार नामदास,1,केदार मेहेंदळे,1,केशव मेश्राम,1,केशवकुमार,2,केशवसुत,5,कोल्हापूर,1,कोशिंबीर सलाड रायते,14,कौशल इनामदार,1,खंडोबाची स्थाने,2,खंडोबाच्या आरत्या,2,खरगपूर,1,ग दि माडगूळकर,6,ग ल ठोकळ,3,ग ह पाटील,4,गंगाधर गाडगीळ,1,गझलसंग्रह,1,गडचिरोली,1,गणपतीच्या आरत्या,5,गणपतीच्या गोष्टी,24,गणेश कुडे,2,गणेश तरतरे,19,गणेश निदानकर,1,गणेश पाटील,1,गणेश भुसारी,1,गण्याचे विनोद,1,गाडगे बाबा,1,गायत्री सोनजे,5,गावाकडच्या कविता,14,गुरुदत्त पोतदार,2,गुरूच्या आरत्या,2,गुलझार काझी,1,गो कृ कान्हेरे,1,गो गं लिमये,1,गोकुळ कुंभार,13,गोड पदार्थ,56,गोपीनाथ,2,गोविंद,1,गोविंदाग्रज,1,गौतम जगताप,1,गौरांग पुणतांबेकर,1,घरचा वैद्य,2,घाट,1,चंद्रकांत जगावकर,1,चंद्रपूर,1,चटण्या,3,चातुर्य कथा,6,चित्रपट समीक्षा,1,चैतन्य म्हस्के,1,चैत्राली इंगळे,2,जयश्री चुरी,1,जयश्री मोहिते,1,जवाहरलाल नेहरू,1,जळगाव,1,जाई नाईक,1,जानेवारी,31,जालना,1,जितेश दळवी,1,जिल्हे,31,जीवनशैली,431,जुलै,31,जून,30,ज्योती किरतकुडवे,1,ज्योती मालुसरे,1,टीझर्स,1,ट्रेलर्स,3,ठाणे,2,डिसेंबर,31,डॉ मानसी राजाध्यक्ष,1,डॉ. दिलीप धैसास,1,तनवीर सिद्दिकी,1,तन्मय धसकट,1,तरुणाईच्या कविता,7,तिच्या कविता,64,तुकाराम गाथा,4,तुकाराम धांडे,1,तुतेश रिंगे,1,तेजश्री शिंदे-कांबळे,1,तेजस्विनी देसाई,1,दत्ता हलसगीकर,2,दत्ताच्या आरत्या,5,दत्तात्रय भोसले,1,दत्तो तुळजापूरकर,1,दया पवार,1,दर्शन जोशी,2,दर्शन शेळके,1,दशरथ मांझी,1,दादासाहेब गवते,1,दामोदर कारे,1,दिनदर्शिका,366,दिनविशेष,366,दिनेश बोकडे,1,दिनेश लव्हाळे,1,दिनेश हंचाटे,1,दिपक शिंदे,2,दिपाली गणोरे,1,दिवाळी फराळ,26,दीपा दामले,1,दीप्तीदेवेंद्र,1,दुःखाच्या कविता,75,दुर्गेश साठवणे,1,देवीच्या आरत्या,3,देशभक्तीपर कविता,2,धनंजय सायरे,1,धनराज बाविस्कर,69,धनश्री घाणेकर,1,धार्मिक स्थळे,1,धुळे,1,धोंडोपंत मानवतकर,12,नमिता प्रशांत,1,नलिनी तळपदे,1,ना के बेहेरे,1,ना घ देशपांडे,4,ना धों महानोर,3,ना वा टिळक,1,नांदेड,1,नागपूर,1,नारायण शुक्ल,1,नारायण सुर्वे,2,नाशिक,1,नासीर संदे,1,निखिल पवार,3,नितीन चंद्रकांत देसाई,1,निमित्त,4,निराकाराच्या कविता,11,निवडक,7,निसर्ग कविता,35,निसर्ग चाटे,1,निळू फुले,1,नृसिंहाच्या आरत्या,1,नोव्हेंबर,30,न्याहारी,50,पथ्यकर पदार्थ,2,पद्मा गोळे,4,परभणी,1,पराग काळुखे,1,पर्यटन स्थळे,1,पल्लवी माने,1,पवन कुसुंदल,2,पांडुरंग वाघमोडे,3,पाककला,322,पाककृती व्हिडिओ,15,पालकत्व,7,पावसाच्या कविता,38,पी के देवी,1,पु ल देशपांडे,9,पु शि रेगे,1,पुंडलिक आंबटकर,4,पुडिंग,10,पुणे,13,पुरुषोत्तम जोशी,1,पुरुषोत्तम पाटील,1,पुर्वा देसाई,2,पूजा काशिद,1,पूजा चव्हाण,1,पूनम राखेचा,1,पोस्टर्स,5,पोळी भाकरी,27,पौष्टिक पदार्थ,20,प्र श्री जाधव,12,प्रकाश पाटील,1,प्रजोत कुलकर्णी,1,प्रतिक बळी,1,प्रतिभा जोजारे,1,प्रतिमा इंगोले,1,प्रतिक्षा जोशी,1,प्रदिप कासुर्डे,1,प्रफुल्ल चिकेरूर,10,प्रभाकर महाजन,1,प्रभाकर लोंढे,3,प्रवास वर्णन,1,प्रवासाच्या कविता,11,प्रविण पावडे,15,प्रवीण दवणे,1,प्रवीण राणे,1,प्रशांतकुमार मोहिते,1,प्रसन्न घैसास,2,प्रज्ञा वझे,2,प्रज्ञा वझे-घारपुरे,10,प्राजक्ता गव्हाणे,1,प्रितफुल प्रित,1,प्रिती चव्हाण,27,प्रिया जोशी,1,प्रियांका न्यायाधीश,3,प्रेम कविता,97,प्रेरणादायी कविता,17,फ मुं शिंदे,3,फादर स्टीफन्स,1,फेब्रुवारी,29,फोटो गॅलरी,10,फ्रॉय निस्सेन,1,बहिणाबाई चौधरी,6,बा भ बोरकर,8,बा सी मर्ढेकर,6,बातम्या,11,बाबा आमटे,1,बाबाच्या कविता,9,बाबासाहेब आंबेड,1,बायकोच्या कविता,5,बालकविता,14,बालकवी,8,बाळाची मराठी नावे,1,बाळासाहेब गवाणी-पाटील,21,बिपीनचंद्र नेवे,1,बी अरुणाचलाम्‌,1,बी रघुनाथ,1,बीड,1,बुलढाणा,1,बेकिंग,9,बेहराम कॉन्ट्रॅक्टर,1,भंडारा,1,भक्ती कविता,18,भक्ती रावनंग,1,भरत माळी,2,भा दा पाळंदे,1,भा रा तांबे,7,भा वें शेट्टी,1,भाज्या,29,भाताचे प्रकार,16,भानुदास,1,भानुदास धोत्रे,1,भावनांची वादळे,1,भुषण राऊत,1,भूगोल,1,भूमी जोशी,1,म म देशपांडे,1,मं वि राजाध्यक्ष,1,मंगला गोखले,1,मंगळागौरीच्या आरत्या,2,मंगेश कळसे,9,मंगेश पाडगांवकर,5,मंजुषा कुलकर्णी,2,मंदिरांचे फोटो,3,मंदिरे,4,मधल्या वेळेचे पदार्थ,41,मधुकर आरकडे,1,मधुकर जोशी,1,मधुसूदन कालेलकर,2,मनमोहन नातू,3,मनाचे श्लोक,205,मनिषा दिवेकर,3,मनिषा फलके,1,मनोज शिरसाठ,1,मराठी,1,मराठी उखाणे,2,मराठी कथा,107,मराठी कविता,1142,मराठी कवी,3,मराठी कोट्स,4,मराठी गझल,29,मराठी गाणी,2,मराठी गोष्टी,67,मराठी चारोळी,42,मराठी चित्रपट,18,मराठी टिव्ही,52,मराठी नाटक,1,मराठी पुस्तके,5,मराठी प्रेम कथा,23,मराठी भयकथा,44,मराठी मालिका,19,मराठी रहस्य कथा,2,मराठी लेख,47,मराठी विनोद,1,मराठी साहित्य,287,मराठी साहित्यिक,2,मराठी सुविचार,2,मराठीप्रेमी पालक महासंमेलन,5,मराठीमाती,147,मसाले,12,महात्मा गांधी,8,महात्मा फुले,1,महाराष्ट्र,304,महाराष्ट्र फोटो,10,महाराष्ट्राचा इतिहास,32,महाराष्ट्रीय पदार्थ,22,महालक्ष्मीच्या आरत्या,2,महेंद्र म्हस्के,1,महेश जाधव,3,महेश बिऱ्हाडे,9,मांसाहारी पदार्थ,17,माझं मत,4,माझा बालमित्र,90,मातीतले कोहिनूर,19,माधव ज्यूलियन,6,माधव मनोहर,1,माधवानुज,3,मानसी सुरज,1,मारुतीच्या आरत्या,2,मार्च,31,मीना तालीम,1,मुंबई,12,मुंबई उपनगर,1,मुकुंद भालेराव,1,मुकुंद शिंत्रे,35,मुक्ता चैतन्य,1,मुलांची नावे,1,मुलाखती,1,मे,31,मैत्रीच्या कविता,7,मोहिनी उत्तर्डे,2,यवतमाळ,1,यशपाल कांबळे,4,यशवंत दंडगव्हाळ,24,यादव सिंगनजुडे,2,योगा,1,योगेश कर्डिले,6,योगेश सोनवणे,2,रंगपंचमी,1,रंजना बाजी,1,रजनी जोगळेकर,5,रत्नागिरी,1,रविंद्र गाडबैल,1,रविकिरण पराडकर,1,रवींद्र भट,1,रा अ काळेले,1,रा देव,1,रागिनी पवार,1,राजकीय कविता,12,राजकुमार शिंगे,1,राजेंद्र भोईर,1,राजेश पोफारे,1,राजेश्वर टोणे,3,राम मोरे,1,रामकृष्ण जोशी,2,रामचंद्राच्या आरत्या,5,रायगड,1,राहुल अहिरे,3,रुपेश सावंत,1,रेश्मा जोशी,2,रेश्मा विशे,1,रोहित काळे,7,रोहित साठे,14,लघुपट,3,लता मंगेशकर,2,लहुजी साळवे,1,लक्ष्मण अहिरे,2,लक्ष्मीकांत तांबोळी,2,लातूर,1,लिलेश्वर खैरनार,2,लीना पांढरे,1,लीलावती भागवत,1,लोकमान्य टिळक,3,लोणची,9,वंदना विटणकर,2,वर्धा,1,वसंत बापट,12,वसंत साठे,1,वसंत सावंत,1,वा गो मायदेव,1,वा ना आंधळे,1,वा भा पाठक,2,वा रा कांत,3,वात्रटिका,2,वामन निंबाळकर,1,वासुदेव कामथ,1,वाळवणाचे पदार्थ,6,वि दा सावरकर,3,वि भि कोलते,1,वि म कुलकर्णी,5,वि स खांडेकर,1,विंदा करंदीकर,8,विक्रम खराडे,1,विचारधन,215,विजय पाटील,1,विजया जहागीरदार,1,विजया वाड,2,विजया संगवई,1,विठ्ठल वाघ,3,विठ्ठलाच्या आरत्या,5,विद्या कुडवे,4,विद्या जगताप,2,विद्याधर करंदीकर,1,विनायक मुळम,1,विरह कविता,58,विराज काटदरे,1,विलास डोईफोडे,4,विवेक जोशी,3,विशाल शिंदे,1,विशेष,12,विष्णूच्या आरत्या,4,विज्ञान तंत्रज्ञान,2,वृषाली काकडे,2,वृषाली सुनगार-करपे,1,वेदांत कोकड,1,वैभव गव्हाळे,1,वैभव सकुंडे,1,वैशाली झोपे,1,वैशाली नलावडे,1,व्यंगचित्रे,55,व्रत-वैकल्ये,1,व्हिडिओ,13,शंकर रामाणी,1,शंकर विटणकर,1,शंकर वैद्य,1,शंकराच्या आरत्या,4,शरणकुमार लिंबाळे,1,शशांक रांगणेकर,1,शशिकांत शिंदे,1,शां शं रेगे,1,शांततेच्या कविता,8,शांता शेळके,11,शांताराम आठवले,1,शाम जोशी,1,शारदा सावंत,4,शाळेचा डबा,15,शाळेच्या कविता,10,शितल सरोदे,1,शिरीष पै,1,शिरीष महाशब्दे,8,शिल्पा इनामदार-आर्ते,1,शिवाजी महाराज,7,शिक्षकांवर कविता,4,शुभम बंबाळ,2,शुभम सुपने,2,शेतकर्‍याच्या कविता,13,शेती,1,शेषाद्री नाईक,1,शैलेश सोनार,1,श्याम खांबेकर,1,श्रद्धा नामजोशी,9,श्रावणातल्या कहाण्या,27,श्री दि इनामदार,1,श्री बा रानडे,1,श्रीकृष्ण पोवळे,1,श्रीधर रानडे,2,श्रीधर शनवारे,1,श्रीनिवास खळे,1,श्रीपाद कोल्हटकर,1,श्रीरंग गोरे,1,श्रुती चव्हाण,1,संघर्षाच्या कविता,32,संजय उपाध्ये,1,संजय डोंगरे,1,संजय पाटील,1,संजय बनसोडे,2,संजय शिंदे,1,संजय शिवरकर,5,संजय सावंत,1,संजीवनी मराठे,3,संत एकनाथ,1,संत चोखामेळा,1,संत जनाबाई,1,संत तुकडोजी महाराज,2,संत तुकाराम,8,संत नामदेव,3,संत ज्ञानेश्वर,6,संतोष जळूकर,1,संतोष झोंड,1,संतोष सेलुकर,30,संदिप खुरुद,5,संदीपकुमार खुरुद,1,संदेश ढगे,39,संध्या भगत,1,संपादक मंडळ,1,संपादकीय,11,संपादकीय व्यंगचित्रे,2,संस्कार,2,संस्कृती,133,सई कौस्तुभ,1,सचिन पोटे,12,सचिन माळी,1,सण-उत्सव,22,सणासुदीचे पदार्थ,32,सतिश चौधरी,1,सतीश काळसेकर,1,सदानंद रेगे,2,सदाशिव गायकवाड,2,सदाशिव माळी,1,सनी आडेकर,10,सप्टेंबर,30,समर्थ रामदास,206,समर्पण,9,सरबते शीतपेये,8,सरयु दोशी,1,सरला देवधर,1,सरिता पदकी,3,सरोजिनी बाबर,1,सलीम रंगरेज,8,सविता कुंजिर,1,सांगली,1,सागर बनगर,1,सागर बाबानगर,1,सातारा,1,साने गुरुजी,5,सामाजिक कविता,112,सामान्य ज्ञान,8,सायली कुलकर्णी,7,साहित्य सेतू,1,साक्षी खडकीकर,9,साक्षी यादव,1,सिंधुदुर्ग,1,सिद्धी भालेराव,1,सिमा लिंगायत-कुलकर्णी,3,सुदेश इंगळे,20,सुधाकर राठोड,1,सुनिल नागवे,1,सुनिल नेटके,2,सुनील गाडगीळ,1,सुभाष कटकदौंड,2,सुमती इनामदार,1,सुमित्र माडगूळकर,1,सुरज दळवी,1,सुरज दुतोंडे,1,सुरज पवार,1,सुरेश भट,2,सुरेश सावंत,2,सुशील दळवी,1,सुशीला मराठे,1,सुहास बोकरे,6,सैनिकांच्या कविता,4,सैरसपाटा,127,सोपानदेव चौधरी,1,सोमकांत दडमल,1,सोलापूर,1,सौरभ सावंत,1,स्तोत्रे,2,स्नेहा कुंभार,1,स्फुटलेखन,2,स्फूर्ती गीत,1,स्माईल गेडाम,4,स्वप्नाली अभंग,5,स्वप्नील जांभळे,1,स्वाती काळे,1,स्वाती खंदारे,320,स्वाती गच्चे,1,स्वाती दळवी,9,स्वाती नामजोशी,31,स्वाती पाटील,1,स्वाती वक्ते,2,ह मुलांची नावे,1,हमार्टिक समा,1,हरितालिकेच्या आरत्या,1,हर्षद खंदारे,42,हर्षद माने,1,हर्षदा जोशी,3,हर्षवर्धन घाटे,2,हर्षाली कर्वे,2,हसनैन आकिब,3,हेमंत जोगळेकर,1,हेमंत देसाई,1,हेमंत सावळे,1,हेमा चिटगोपकर,8,होळी,5,ज्ञानदा आसोलकर,1,ज्ञानदेवाच्या आरत्या,2,
ltr
item
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन: मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांत
मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांत
मराठीप्रेमी पालक महासंमेलन २०२३ कार्यक्रमाचा वृत्तांत [Marathipremi Palak Mahasammelan 2023 Karyakram Vruttant].
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhC88d2Ozu9If4zyMDxIPaSGY9XvSYoLlYKEefw-VrhejjtIc5WVePU0XyH1NMDul4oqFM8ZWjscy4aEL3Jb3YuwXo4HINdKIkHODFpY1-6utX-TNov35XZfG2NNfrpLg5wnd5VQ2sbnsbjNk2r-obDD39vSegjmK-vrwDHmBIKbaNCIl0m7UBrZKDTl5kh/s1600-rw/marathipremi-palak-mahasammelan-2023-karyakram-vruttant.webp
https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhC88d2Ozu9If4zyMDxIPaSGY9XvSYoLlYKEefw-VrhejjtIc5WVePU0XyH1NMDul4oqFM8ZWjscy4aEL3Jb3YuwXo4HINdKIkHODFpY1-6utX-TNov35XZfG2NNfrpLg5wnd5VQ2sbnsbjNk2r-obDD39vSegjmK-vrwDHmBIKbaNCIl0m7UBrZKDTl5kh/s72-c-rw/marathipremi-palak-mahasammelan-2023-karyakram-vruttant.webp
मराठीमाती । माझ्या मातीचे गायन
https://www.marathimati.com/2023/12/marathipremi-palak-mahasammelan-2023-karyakram-vruttant.html
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/
https://www.marathimati.com/2023/12/marathipremi-palak-mahasammelan-2023-karyakram-vruttant.html
true
2079427118266147504
UTF-8
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची