Loading ...

घे त्यांनाही सोबत (मराठी कविता)

घे त्यांनाही सोबत (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी यशपाल कांबळे यांची घे त्यांनाही सोबत ही मराठी कविता.

घे त्यांनाही सोबत (मराठी कविता)

विचारतोस काय, घे त्यांनाही सोबत


घे त्यांनाही सोबत (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘यशपाल कांबळे’ यांची ‘घे त्यांनाही सोबत’ ही मराठी कविता.



विचारतोस काय?
घे त्यांनाही सोबत
उतरव त्यांनाही या लढाईत
बापू म्हणतात त्यांना भाऊ
लढाई खूप वाढत चाललीये
मग घे सगळे अस्त्र सोबत
जर झालंच काम भगतसिंगाने
तर घे त्यालाही सोबत
ईंकलाब जिंदाबादने उठवू दे त्याला रान
बघ भाऊ...
हेजिटेशन आणि डिस्क्रिमीनेशन जरा बाजूला ठेव
आता वेळ आपापसात भांडायची नाही
इकडचा बिरसा मुंडा घे
तिकडचा पेरियार घे
लाल घे, निळा घे
विवेक पेरणारा बुद्ध घे
विज्ञान घे, माणूसपण घे
जास्त दूर जायचं नाही भाऊ
आपण जागोजागी महापुरुषांना घेऊ सोबत
विद्यापीठाल्या विद्यार्थ्यांनीच नाही घेतला ठेका
देश वाचवण्याचा!
जमेल त्याला घे सोबत
शत्रूला संपवायचं आहे आज!
पण...
न विसरता घे सोबत घटनाकाराला
त्यांच्या नावाचीही शिसारी आहे इथल्या टाळक्यांना
तरी...
जिंकताच येणार नाही ही लढाई
त्यांच्याशिवाय
आपला श्वास थांबला तरी बत्तर
पण मरता कामा नये बघ
त्यांनी दिलेलं संविधान!
म्हणून घे भावा सोबत
माणसामाणसाला
माणसातल्या करुणेला


घे त्यांनाही सोबत (मराठी कविता) यासंबंधी महत्त्वाचे दुवे:


- यशपाल कांबळे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची