Loading ...

हक्क प्रकाशाचा (मराठी कविता)

हक्क प्रकाशाचा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी यशपाल कांबळे यांची हक्क प्रकाशाचा ही कविता.

हक्क प्रकाशाचा (मराठी कविता)

अधूनमधून इंडिया गेट आणि गेट वे ऑफ इंडियासमोर...


हक्क प्रकाशाचा (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘यशपाल कांबळे’ यांची ‘हक्क प्रकाशाचा’ ही मराठी कविता.



अधूनमधून
इंडिया गेट आणि
गेट वे ऑफ इंडियासमोर
पेटणाऱ्या त्या मेणबत्त्या सापडल्या
तर सांगता का जरा
इकडे भीम नगरातही
अंधार पडलाय म्हणावं,
होतंच नाही दूर इथला अंधार
आमच्या आवाजानं,
फेसबुक आणि
व्हाट्सएपवर फिरणाऱ्या
अपीलात जोडा
‘भीमनगरातही पडलेल्या
अंधाराचं’ हॅशटॅग कॅम्पेन
तुमची एखादी मेणबत्ती
इकडेही फेका म्हणून
१९५१ ला
तुमचा अंधार दूर करण्यासाठी
मंत्रिमंडळाचा राजीनामा
दिला होता म्हणे
संविधान निर्मात्यानेच
आणि तोडली होती म्हणे
तुमची गुलामी त्याच संविधानाने,
तुमच्या नाजूक मेणबत्तीला
भीमनगरात यायला
थोडी अडचण होईल,
तरी
हक्क प्रकाशाचा आहे म्हणून
तोडून या जातीच्या चौकटींना
पेटवा जरा इकडेही
तुमची रंगीबेरंगी मेणबत्ती
भविष्यात काहीही झालं तर
सज्जच आहे आमचं रक्त
तुमचा अंधार दूर करण्यासाठी
प्रश्न प्रकाशाचा आहे
हक्क प्रकाशाचा आहे...

- यशपाल कांबळे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची