Loading ...
/* Dont copy */

त्यांना हे शिकवाच (मराठी कविता)

त्यांना हे शिकवाच (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अरविंद थगनारे यांची त्यांना हे शिकवाच ही मराठी कविता.

त्यांना हे शिकवाच (मराठी कविता)

आदरणीय गुरूजी, सगळीच माणसं शांतिब्रम्ह नसतात


त्यांना हे शिकवाच (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘अरविंद थगनारे’ यांची ‘त्यांना हे शिकवाच’ ही मराठी कविता.



आदरणीय गुरूजी,
सगळीच माणसं शांतिब्रम्ह नसतात.
अन् नसतात सगळीच वाचाळ
हे जाणतीलच मुले कधी ना कधी.
मात्र त्यांना हे आवर्जून शिकवा,
अध्यापनी शांतता नित बाळगावे,
वाद-विवादात मौन तोडावे.
वर्गात प्रत्येक बाकागणिक
तुम्ही डोकावून पहा,
आढळून येतील अनेक वर्तन विशेष
दिसतील खोडकर पुढच्याच्या शर्टवर
रेघा मारणारे
तसे दिसतील प्रामाणिकतेने
स्वाध्याय सोडवणारे
त्यातही काही साहित्याअभावी गप्प बसलेले.
मला माहित आहे
सगळ्याच गोष्टी चटकन लक्षात नाही येतील.
तरीही जमलं तर त्यांच्या अंतरात शिरा
समस्या जाणा,
समानानुभूती घ्या,
अडचणींचं निराकरण करा.
तरीही जमलं तर त्यांच्या मनावर ठसवा,
कोणत्याही परभाषेचा पाया
स्वभाषाच असते,
म्हणून मातृभाषेची हेळसांड करू नका म्हणावं.
अवधानपूर्वक वाचलेला एकच उतारा
आकलनशून्य पाठामागून पाठ वाचण्यापेक्षा हितकर आहे.
अपयश कसं स्विकारावं हे त्यांना शिकवा
आणि शिकवा अपयशातच यश दडलेलं आहे ते.
तुमच्यात क्षमता असेल तर
त्यांना पोपटपंचीपासून दूर राहायला शिकवा.
शिकवा त्यांना अर्थपूर्णतेने व्यक्त व्हायला.
संकटांना भीत जाऊ नका म्हणावं,
कणखरपणे पाय रोवून उभा राहावं त्यांनी.
जमेल तेवढे दाखवित जा त्यांना
विज्ञानातील प्रयोग,
मात्र त्याबरोबरच
योग, प्राणायाम यांचेही धडे द्या,
वाढू द्या मनःशक्ती अन् आरोग्य.
शिकू द्या त्यांना परकाया प्रवेश करायला
अन् अनुभवू द्या दुसऱ्यांची सुख - दुःखे.
शाळेत त्यांना हा धडा मिळू द्या
पाहून लिहून मिळवलेल्या गुणांपेक्षा
स्वक्षमतेने मिळवलेला एकच गुण महत्वाचा आहे.
आपली क्षमता, आपली कौशल्ये
जाणून घ्यायला हवीत त्यांनी.
श्रेयस्कर आहे भाराभर पुस्तके वाचण्यापेक्षा
स्वतःला ओळखून त्या दिशेने वाटचाल करणे.
त्यांना शिकवा
चित्त एकाग्र करायला
आणि अध्ययन - अध्यापनात रमायला
त्यांना पटवता आलं तर हे पटवा
मनोबलाद्वारे जगही जिंकता येते
पण त्याच्या जोडीला हवे शुद्ध चारित्र्य.
पुढे त्यांना हेही सांगा
सगळ्यांच्या मतांचा आदर करायला,
विचारमंथनातून निमकं स्वीकारायला.
जमलं तर त्यांच्या मनावर बिंबवा
कामात देव आहे
म्हणून कोणतेही काम तुच्छ लेखू नका.
त्यांना शिकवा
निरोगी शरीरासाठी खेळ खेळायला
अन् घाम गाळायला.
त्यांना हे समजवा की,
असत्य कितीही बलवत्तर असले तरी
सत्य झाकाळले जाणार नाही.
ते दिवाकरासारखे तेजोमय आहे.
पाहून नये ते पाहिल्यानंतर,
ऐकू नये ते ऐकल्यानंतर
कानाडोळा करायला शिकवा त्यांना,
आणि ठसवा त्यांच्या मनावर.
जीवन सुंदर आहे,
ते सत्कृत्याने अधिक सुंदर होते.
त्यांच्याशी माऊलीच्या मायेनं वागा
पण अक्षम्य अपराध पोटात घालू नका.
टाकीचे घाव सोसल्याशिवाय
देवपण येत नाही.
कधीही कसलेही करू नये चौर्य
ज्येष्ठांची आज्ञा मानावी शिरोधार्य.
आणखी एक विसरलोच पहा!
स्वदेश, स्वभाषेचा स्वाभिमान बाळगावा
पण परदेश, परभाषेचा आदर करावा.
माफ करा गुरूजी! मी फार बोलतोय,
फार मागतोय
पण... जमेल तेवढं कराच.
ही मुलं म्हणजे
बागेतील सुंदर फुलेच आहेत हो,
त्यांना फुलवणे तुमच्याच हाती आहे.

- अरविंद थगनारे

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची