Loading ...

भगव्या हिरव्या निळ्या टोप्या चढवलेले (मराठी कविता)

भगव्या हिरव्या निळ्या टोप्या चढवलेले (मराठी कविता) - [Bhagavya Hiravya Nilya Topya Chadhavlele, Marathi Kavita] मेंदू पसरलेत सगळीकडे.

भगव्या हिरव्या निळ्या टोप्या चढवलेले - मराठी कविता | Bhagavya Hiravya Nilya Topya Chadhavlele - Marathi Kavita

भगव्या, हिरव्या, निळ्या टोप्या चढवलेले, मेंदू पसरलेत सगळीकडे


भगव्या हिरव्या निळ्या टोप्या चढवलेले (मराठी कविता)

(Bhagavya Hiravya Nilya Topya Chadhavlele - Marathi Kavita).



भगव्या, हिरव्या, निळ्या टोप्या चढवलेले
मेंदू पसरलेत सगळीकडे
एक टोपी रंग नसलेली
कुणी माझ्याकडेही फेका
मला पाऊस खूप लागतोय...

घराघरात पिझ्झा पोचवणारे
तुमची हौस भागवतीलही
ज्वारीचा एखादा दाणा
कुणी माझ्या शेतातही फेका
मला भूक खूप लागलीये...

त्या बंद पडलेल्या शाळेच्या जागी
लख्ख उजेडाचा मॉल दिसतोय
गेट वे ऑफ इंडियावर जळणारी एखादी मेणबत्ती
कुणी माझ्या झोपडीतही पेटवा
मला भीती खूप वाटतेय...

इथल्या झोपड्या अन्‌ शेती हिसकावून
अडाणी लोकांनी इमले बांधलेत
वाचलेली झोपडी झाकण्यासाठी
एखादं छप्पर माझ्याकडेही फेका
माझी झोपडी खूप खचलेय...

- यशपाल कांबळे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची