Loading ...

शांत बहरलेली रात्र - मराठी कविता (शिरीष पै)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी शिरीष पै (श्रीमती शिरीष व्यंकटेश पै) यांची शांत बहरलेली रात्र ही लोकप्रिय मराठी कविता.

शांत बहरलेली रात्र - मराठी कविता (शिरीष पै)

शांत बहरलेली रात्र, आकाश कसे जवळ आले आहे


शांत बहरलेली रात्र - मराठी कविता (शिरीष पै)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी शिरीष पै (श्रीमती शिरीष व्यंकटेश पै) यांची शांत बहरलेली रात्र ही लोकप्रिय मराठी कविता.



शांत बहरलेली रात्र
आकाश कसे जवळ आले आहे

तेज गोठावे तसे साठले आहेत
पांढर्‍या ढगांचे पुंजके दक्षिणेला
चांदण्यादेखील मोजून घ्याव्यात इतक्याच
विखुरलेल्या स्निग्ध

उंच इमारती झाल्या आहेत अबोल
दिवे केव्हाच विझून गेलेत

वारा फक्त झुळझुळत आहे पडद्यांना हेलकावे देत किंचित
लांबलचक पसरले आहेत रस्ते निर्जन
पावले दूर गेलेली
सारेच स्वर बुडाले आहेत निद्रेच्या संथ प्रवाहात खोल
जाणवतो आहे फक्त शांततेचा रंग

गडद… गंभीर… काळाभोर
पलीकडे सारेच आकार हरवले आहेत… त्यात माझाही

- शिरीष पै (श्रीमती शिरीष व्यंकटेश पै)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची