Loading ...

गोष्ट पावसाची (मराठी कविता)

गोष्ट पावसाची (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री अश्विनी तासगांवकर यांची गोष्ट पावसाची ही मराठी कविता.

गोष्ट पावसाची (मराठी कविता)

टपटप टपटप रिपरिप रिपरिप पाऊस आला दारी...


गोष्ट पावसाची (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री ‘अश्विनी तासगांवकर’ यांची ‘गोष्ट पावसाची’ ही मराठी कविता.



टपटप टपटप रिपरिप रिपरिप पाऊस आला दारी
गम्मत जम्मत गोष्ट त्याची ऐका आता भारी

पाण्याला लागली ओढ आकाशाची
उंच उंच आभाळी सैर करण्याची

सुर्याने केले कबुल सैर करवण्याचे
एका अटीवर, जमिनीवर परत यायचे

सूर्य मग तापला, लाल लाल झाला खुप
पाण्याला दिले त्याने गरम वाफेचे रूप

घों घों घों घों सों सों सों सों भिरभिरणारा वारा
हलके फुलके पंख आता मिळणार पाण्याला

सूर्याने दिले पाण्यास पंख वाफेचे
पाणी झाले खुष , त्याला वेध आभाळाचे

हलके होउन पाणी उंच उंच गेले
आभाळात उडण्याचे स्वप्न पूर्ण झाले

उडताना वाफेला, थंडी वाजली फार
आणि त्यातून तयार झाले पाण्याचे तुषार

गडगड गडगड धडाम धुडूम जमले ढग काळे
काळा कुट्ट मिट्ट मिट्ट काळोख सगळीकडे

आरूढ झाले जलबिंदू ढगांच्या जहाजात
आकाशातून सैर करू लागले दिमाखात

ढगांचे जहाज डोंगर माथ्यावर उतरले
त्यातून पाण्याचे तुषार बाहेर उडले

वेगाने ते पाणी जमिनीवर बरसले
आकाशाची सफर करून घरी परत आले

खळखळ खळखळ झुळझुळ झुळझुळ झरे वाहू लागले
रानोरानी पानोपानी हिरवे रंग फुलले

आकाशाच्या सफरीमध्ये जादू मोठी झाली
नव्या रूपात पाण्याची सर खाली आली

जमिनीवरील पाणी होते मातीने भरलेले
आकाशातून येताना शुद्ध होउन आले

निसर्ग आहे, खरा किमयागार
नेमेचि पाऊस, त्याचे अनंत उपकार


गोष्ट पावसाची (मराठी कविता) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- अश्विनी तासगांवकर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची