पाऊस ओला सांजवेळी - मराठी कविता

पाऊस ओला सांजवेळी, मराठी कविता - [Paus Ola Sanjveli, Marathi Kavita] पाऊस ओला सांजवेळी, अन् कवितेच्या काही ओळी.

पाऊस ओला सांजवेळी, अन् कवितेच्या काही ओळी

पाऊस ओला सांजवेळी
अन् कवितेच्या काही ओळी
मीच हरवले मनात माझ्या
कुठल्या देशी, कुठल्या काळी

जिथे पावले घेऊन आली
त्याचीच पाऊलवाट झाली
चालत चालत कुठवर आले
निमिशरेषाही संपून गेली


श्रद्धा नामजोशी | Shraddha Namjoshi
सभासद, मराठीमाती डॉट कॉम
मराठी कविता या विभागात लेखन.

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.