Loading ...
/* Dont copy */

पाकोळी - मराठी कविता (शांता शेळके)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री शांता शेळके यांची पाकोळी ही लोकप्रिय मराठी कविता.

पाकोळी - मराठी कविता (शांता शेळके)

हिरवी झाडी, पिवळा डोंगर, निळी-सावळी दरी


पाकोळी - मराठी कविता (शांता शेळके)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री शांता शेळके यांची पाकोळी ही लोकप्रिय मराठी कविता.



हिरवी झाडी, पिवळा डोंगर,
निळी-सावळी दरी,
बेट बांबुचे त्यातुन वाजे
वाऱ्याची पावरी.

कभिन्न काळ्या खडकांमधुनी
फुटति दुधाचे झरे,
संथपणाने गिरक्या घेती
शुभ्र शुभ्र पाखरे!

सोनावळिच्या सोनफुलांचा
बाजुस ताफा उभा,
तलम धुक्याची निळसर मखमल
उडते, भिडते नभा.

हिरवी ओली मखमल पायी
तशी दाट हिरवळ,
अंग झाडतो भिजला वारा
त्यात नवा दरवळ.

डूल घालुनी जळथेंबांचे
तृणपाते डोलते,
शीळ घालुनी रानपाखरु
माझ्याशी बोलते!

गोजिरवाणे करडू होउन
काय इथे बागडू?
पाकोळी का पिवळी होऊन
फुलांफुलांतुन उडू?

- शांता शेळके

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची