Loading ...

मनीषा - मराठी कविता (शांता शेळके)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री शांता शेळके यांची मनीषा ही लोकप्रिय मराठी कविता.

मनीषा - मराठी कविता (शांता शेळके)

सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे


मनीषा - मराठी कविता (शांता शेळके)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री शांता शेळके यांची मनीषा ही लोकप्रिय मराठी कविता.



सहज मिळे त्यात जीव तृप्तता न पावे
जे सुदूर, जे असाध्य, तेथे मन धावे!

भेदुनिया गगनाला
लखलखते जी चपला

तेज तिचे वाटे हृदयी कवळावे!

पर्वत जो उंच उभा
चुम्बितसे नील नभा

शिरि त्याच्या की सलील वाटे विहरावे!

सांध्यमेघ सोनेरी
विलसति जे क्षितिजावरि

गमते की सुंदर त्या मंदिरी रहावे!

रजनीच्या कृष्णपटी
नक्षत्रे झगमगती

भव्य दिव्य वैभव ते वाटे भोगावे!

जेथ बुद्धि, जेथ धीर
जे अथांग, जे गभीर

हृदयी त्या अवगाहन वाटते करावे!

- शांता शेळके

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची