Loading ...
/* Dont copy */

माझ्या शब्दांनो - मराठी कविता (शरणकुमार लिंबाळे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी शरणकुमार लिंबाळे यांची माझ्या शब्दांनो ही लोकप्रिय मराठी कविता.

माझ्या शब्दांनो - मराठी कविता (शरणकुमार लिंबाळे)

माझ्या शब्दांनो! जे मूकपणे जुलूम सहत असतील


माझ्या शब्दांनो - मराठी कविता (शरणकुमार लिंबाळे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी शरणकुमार लिंबाळे यांची माझ्या शब्दांनो ही लोकप्रिय मराठी कविता.



माझ्या शब्दांनो!
जे मूकपणे जुलूम सहत असतील
त्यांच्या ओठांत प्रलयाची आग व्हा!
जे निमूटपणे गुलामीत जगत असतील
त्यांच्या राक्तपेशींत सुरुंगासारखे पेटत रहा!

माझ्या शब्दांनो!
जे अन्याय-अत्याचारांचे ठेकेदार आहेत
त्यांच्यावर विजांचे अग्निलोळ होऊन बरसा!
लेखण्यांनो, तुम्हां माझे रक्तदान.
बेदरकार झुंजत रहा!

माझ्या प्रिय शब्दांनो!
माझ्या काळजाचे घोष व्हा!
माझ्या अश्रूंचे शिलालेख व्हा!
माझ्या मुक्तीचे शिल्पकार व्हा!
माझ्या क्रांतिकणांनो!
या विशाल बोधिवृक्षाचे
तुम्ही कोटी कोटी पर्ण व्हा!

- शरणकुमार लिंबाळे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची