Loading ...

माणूसपण गारठलंय - मराठी कविता (शशिकांत शिंदे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी शशिकांत शिंदे यांची माणूसपण गारठलंय ही लोकप्रिय मराठी कविता.

माणूसपण गारठलंय - मराठी कविता (शशिकांत शिंदे)

पूर्वी कसा पाऊसकाळ, चार महिने असायचा


माणूसपण गारठलंय - मराठी कविता (शशिकांत शिंदे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी शशिकांत शिंदे यांची माणूसपण गारठलंय ही लोकप्रिय मराठी कविता.



पूर्वी कसा पाऊसकाळ
चार महिने असायचा,
हिरवंगार रान पाहून
माणूस खुशीत हसायचा.

प्रत्येकाची कणगी भरून
धान्य मोप असायचं,
दुधदुभतं, तूप, लोणी
याला माप नसायचं.

पासाभरून धान्य तर
चिमणीच दारात टिपायची,
पै-पाहुण्यांसाठी माय
दिवसरात्र खपायची.

सणवार जत्रांमधून
किती जल्लोष असायचा,
भजन कीर्तन करीत गांव
आख्खी रात्र बसायचा.

एवढ्या तेवढ्या पावसावाचून
सारं चित्र पालटलंय,
गांवपण हरवल्यानं
माणूसपण गारठलंय.

- शशिकांत शिंदे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची