Loading ...

माय - मराठी कविता (वामन निंबाळकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वामन निंबाळकर (वामन सुदामा निंबाळकर) यांची माय ही लोकप्रिय मराठी कविता.

माय - मराठी कविता (वामन निंबाळकर)

जसा दिस बुडून जाई, काळोखाचे राज्य असे


माय - मराठी कविता (वामन निंबाळकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वामन निंबाळकर (वामन सुदामा निंबाळकर) यांची माय ही लोकप्रिय मराठी कविता.



जसा दिस बुडून जाई
काळोखाचे राज्य असे
आम्ही बसू दरवाज्यात
झोपडीत साधा दिवा नसे

घरोघरी दिवे लागत
चुलीलाही जाळ लागे
भाकरी जात बडविल्या
कुठे चून कुठे वांगे

नाकात जाई वास त्याचा
पोटात असे अंधार सारा
तसे येई भडभडून
आसवांच्या डोळ्यांत धारा

अंधाराला चिरत तेव्हा
एक सावली जड येई
डोई तिच्या भारा असे
चालतांना तोल जाई

काळी काळी, कृश देह
ती असे माझी माय
वणवण सकाळपासून
मोळीसाठी रानात जाय

वाट पाहात बसू कधी तिची
सारे आम्ही भाऊ
मोळी नसे विकत तेव्हा
भुकेलेले झोपी जाऊ

एकदा काय झाले कसे
आम्हा काही कळले नाही
माय आली पाय बांधून
भळाभळा रक्त वाही

चावला साप मोठा काळा
दोन बाया होत्य सांगत
फणा काढून मारला त्याने
हळूच गेला निघून रांगत

माय पडली धरणीवर... गंडे झाले
मंत्र झाले, वैद आला
दिवस निघता निघता
तिच्या देहातून प्राण गेला

हंबरडा फोडला आम्ही
तो विरला वाऱ्यावर
माय तरी सोडून गेली
चिल्लेपिल्ले वाऱ्यावर

शोधते माझी नजर माय
आता मी उदास होतो
दिसता कृश मोळीवाली
मोळी तिची विकत घेतो

- वामन निंबाळकर (वामन सुदामा निंबाळकर)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची