Loading ...

अग्निपंख नभि फडफडु दे - मराठी कविता (वा. रा. कांत)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वा. रा. कांत (वामन रामराव कांत) यांची अग्निपंख नभि फडफडु दे ही लोकप्रिय मराठी कविता.

अग्निपंख नभि फडफडु दे - मराठी कविता (वा. रा. कांत)

तव अग्निपंख नभि फडफडु दे


अग्निपंख नभि फडफडु दे - मराठी कविता (वा. रा. कांत)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी वा. रा. कांत (वामन रामराव कांत) यांची अग्निपंख नभि फडफडु दे ही लोकप्रिय मराठी कविता.



तव अग्निपंख नभि फडफडु दे
निजलेल्या चटका लव बसु दे

तुफानवाता बेडी पडली
वीज ढगांतुनि स्वस्थ झोपली
गगन-धरेला जडता खिळली
त्या प्रलयघनांना कडकडु दे
तव अग्निपंख नभि फडफडु दे

आत शांत जरि दिसते जगती
युद्ध-वैर लाव्हारस कढती
धाराकंपनि आग फुटुनि ती
चल जुनाट जग हे तडतडू दे
तव अग्निपंख नभि फडफडु दे

क्रांतिदेवि, ये, विद्युच्चरणी
तव नयनींची ठिणगी उडवुनि
असंतोष पेटवी जनमनी
मग जुलूम कितिही वर गडगडु दे
तव अग्निपंख नभि फडफडु दे

- वा. रा. कांत (वामन रामराव कांत)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची