Loading ...
/* Dont copy */

मोठ्यांचं वागणं - मराठी कविता (विजया जहागीरदार)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री विजया जहागीरदार यांची मोठ्यांचं वागणं ही लोकप्रिय मराठी कविता.

मोठ्यांचं वागणं - मराठी कविता (विजया जहागीरदार)

अस्स कसं असतं हो, मोठ्यांचं वागणं


मोठ्यांचं वागणं - मराठी कविता (विजया जहागीरदार)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री विजया जहागीरदार यांची मोठ्यांचं वागणं ही लोकप्रिय मराठी कविता.



अस्स कसं असतं हो, मोठ्यांचं वागणं?
एकदा एक बोलणं, अन् एकदा एक सांगणं?

अभ्यास केला तर म्हणतात, ‘पुस्तकातला किडा’
खेळायला गेलो की म्हणतात, ‘परीक्षेत रडा’
लौकर उठलं तर म्हणतील ‘नीज अजून थोडा’
उशिरा उठलं तर लागलीच ‘पसरलाय घोडा”

एकदा सांगतील, ‘बाबानो, खरं खरं बोला’
खरं सांगताच म्हणतील, ‘निर्लज्ज मेला’
काम केलं तर लागलीच ‘चंदू हुशार झाला’
चुकले जरा कुठे तर मग ‘चंदू वाया गेला’

एकदा म्हणायचं, ‘जरा दया करायला शीक’
केली की म्हणायचं, ‘बाबा, लावशील मला भीक’
मी कुणाला ठोकून काढल, की मीच ठरतो चिडकट
मला कोणी मारलं की, मीच पुन्हा शेळपट

सांगतो तसे दाखले मी मित्रांच्या घरचे
वस्स्कन म्हणतात ‘नको सांगु कौतुक दुसर्‍यांचे’
शेजारच्या बाळूचा मात्र, सारखा सारखा पुळका
मला आपलं म्हणत राहायचं, ‘त्याचं जरा शिका!’

धीटपणे बोलताच म्हणतील चुरूचुरू करतय तोंड
गप्प बसावे तर लागलीच ‘लाजरच आहे सोंग’
कधी आजारी पडलो तर तेव्हा मात्र म्हणतात
‘चंदू आमचा गुणाचा’ हो तेवढच खरं बोलतात

- विजया जहागीरदार

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची