Loading ...

पड पड पावसा (मराठी कविता)

पड पड पावसा (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी महेश जाधव यांची पड पड पावसा ही मराठी कविता.

पड पड पावसा (मराठी कविता)

पड पड पावसा पावसा, डबक डबक साचू दे


पड पड पावसा (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी ‘महेश जाधव’ यांची ‘पड पड पावसा’ ही मराठी कविता.



पड पड पावसा पावसा
डबक डबक साचू दे
मन माझ लेकरू होऊन
थोडं त्यात नाचू दे

पड पड पावसा पावसा
अंगणात पाणी साचू दे
मन माझं पाणी होऊन
अंगणातून थोडं वाहू दे

पड पड पावसा पावसा
शेतात पाणी साचू दे
मन माझं बगळा होऊन
पाण्यात थोडं खेळू दे

पड पड पावसा पावसा
दरातला गुलाब फुलू दे
मन माझं थेंब होऊन
पाकळ्यावर थोडं निजू दे

पड पड पावसा पावसा
शेत सार फुलू दे
मन माझं पीक होऊन
शेतात थोडं डोलू दे

पड पड पावसा पावसा
डोंगर दऱ्या झरु दे
मन माझं धबधबा होऊन
धबधब करत वाहू दे

पड पड पावसा पावसा
नदी सारी भरू दे
मन माझं काठ होऊन
नदीला कवटाळून राहू दे

पड पड पावसा पावसा
शेतकरी बाप हसू दे
मन माझं पाऊस होऊन
आसू त्याचे पुसू दे


पड पड पावसा (मराठी कविता) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- महेश जाधव

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची