Loading ...

एकदा पावसाने तुला (मराठी कविता)

एकदा पावसाने तुला, मराठी कविता - [Ekda Pavasane Tula, Marathi Kavita] एकदा पावसाने तुला विचारले साधारण कधी येऊ? संदेश ढगे यांची पावसाची कविता.

एकदा पावसाने तुला (मराठी कविता)

एकदा पावसाने तुला विचारले, साधारण कधी येऊ?


एकदा पावसाने तुला (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी संदेश ढगे यांची पावसाची कविता ‘एकदा पावसाने तुला’.



एकदा पावसाने तुला विचारले,
साधारण कधी येऊ?
तर तू म्हणालीस,
इच्छा नसताना.
पावसात तू जितकी चिंब भिजायचीस
तितकीच माझ्याकडे येताना कोरडी.
मग तूच मला गोष्ट सांगितलीस,
आपण दोघं ज्या कागदी नावेवर बसलो होतो
ती उलटल्याची.
नंतर पावसाचे आणि तुझे वैर झाले.
तो वेगळ्याच टापूत बरसू लागला
आणि तू वेगळ्या.
मी मधल्यामध्ये कोरड्या नदीसारखा
आतून झिरपू लागलो.
नंतर नंतर
पाऊस आलाच नाही.
कधी तरी येईन एवढंच म्हणाला आणि
बी रुजल्यानंतरचं वाट पाहणं
आपण दोघांनी स्वीकारलं
समजूतदारपणे.

- संदेश ढगे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची