Loading ...

दगडाची पार्थिव भिंत - मराठी कविता (मनमोहन नातू)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी मनमोहन नातू यांची दगडाची पार्थिव भिंत ही लोकप्रिय मराठी कविता.

दगडाची पार्थिव भिंत - मराठी कविता (मनमोहन नातू)

मी मुक्तामधले मुक्त, कैद्यांमधला कैदी


दगडाची पार्थिव भिंत - मराठी कविता (मनमोहन नातू)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी मनमोहन नातू यांची दगडाची पार्थिव भिंत ही लोकप्रिय मराठी कविता.



मी मुक्तामधले मुक्त - तू कैद्यांमधला कैदी
माझे नि तुझे व्हायाचे - ते सूर कसे संवादी

माझ्यावर लिहिती गीते - या मंद-समीरण लहरी
माझ्यावर चित्रित होते - गरूडाची गर्द भरारी
जड लंगर तुझिया पायी - तू पीस कसा होणार
माझ्याहून आहे योग्य - भूमीला प्रश्न विचार

आभाळ म्हणाले ‘नाही’ - भूमीही म्हणाली ‘नाही’
मग विनायकाने त्यांची - आळवणी केली नाही
पापण्यात जळली लंका - लाह्यांपरि आसू झाले
उच्चारून होण्याआधी - उच्चाटन शब्दा आले

की जन्म घ्यायच्या वेळी - गंगेस हिमालय नाही
शाई न स्पर्शली असूनी - हे अभंग नदिच्या ‘बाही’
दगडाची पार्थिव भिंत - ती पुढे अकल्पित सरली
‘मी कागद झाले आहे - चल ‍‍‍‍‍‍लिही‘ असे ती वदली

- मनमोहन नातू

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची