Loading ...

असं कसं - मराठी कविता (नलिनी तळपदे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री नलिनी तळपदे यांची असं कसं ही लोकप्रिय मराठी कविता.

असं कसं - मराठी कविता (नलिनी तळपदे)

एवढासा ससा त्याचे, एवढे मोठे कान


असं कसं - मराठी कविता (नलिनी तळपदे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री नलिनी तळपदे यांची असं कसं ही लोकप्रिय मराठी कविता.



एवढासा ससा त्याचे
एवढे मोठे कान
एवढा मोठा हत्ती त्याचं
शेपूट मात्र लहान
मान वर करून जिराफ
बघतो तरी काय
पोटांत पाय घालून कशी
चालते गोगलगाय

कुत्र्याचं शेपूट आपलं
नेहमीच वाकडं
माणसासारखी सही-सही
दिसतात कशी माकडं
दोन पाय छोटे
दोन पाय मोठे
कांगारूच्या पोटाला
पिशवी कोण शिवते

एक डोळा बंद करून
बगळा बसतो टपून
पाठीवरचं ओझं कसं
कासव ठेवतं जपून
पंख असून शहामृग
उडत नाही कसं
कुणी दिली मोराला
ही रंगीत पिसं

डोळे मिटून मनीमाऊ
दूध का पिते
उभ्या उभ्या घोड्याला या
झोप कशी येते
उंच उंच आभाळात
घार कशी उडते
पाणी नाही डोळयात
न सुसर कशी रडते
जाऊ दे ते सारं आई
एक सांग मला
नाकावरती म्हशीने का
पाय माझ्या दिला

- नलिनी तळपदे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची