Loading ...
/* Dont copy */

बापुजींची प्राणज्योती - मराठी कविता (मनमोहन नातू)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी मनमोहन नातू यांची बापुजींची प्राणज्योती ही लोकप्रिय मराठी कविता (Bapujinchi Pranjyoti).

बापुजींची प्राणज्योती - मराठी कविता (मनमोहन नातू)

ती पहा, ती पहा, बापुजींची प्राणज्योती


बापुजींची प्राणज्योती - मराठी कविता (मनमोहन नातू)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी मनमोहन नातू यांची बापुजींची प्राणज्योती ही लोकप्रिय मराठी कविता.



ती पहा, ती पहा, बापुजींची प्राणज्योती
तारकांच्या सुमनमाला देव त्यांना वाहती

झुंजला राजासवे हा, रंगला रंकासवे हा
पेटता देहेही आता, दिव्यता दावून जाती

चंदनाचे खोड लाजे, हा झिजे त्याहूनही
आज कोटी लोचनींच्या अश्रुमाला सांडताती

पृथ्वीच्या अक्षांशि लाली, पृथ्विच्या रेखांशि लाली
चार गोळ्या ज्या उडाल्या, दशदिशांना कापताती

नाव ज्याचे ऐकुनीया थरकली सिंहासने
ना जरी तलवार हाती, हा अहिंसेचा पुजारी

सत्य मानी देव आणि झुंजला खोट्यासवे हा
मृत्युच्या अंतीम वेळी, नाम रामाचे मुखी

सिंधु गंगा आणि यमुना, धन्य झाली अस्थिनी
राख तूझी भारताच्या, तिलक झाली रे ललाटी

- मनमोहन नातू

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची