Loading ...
/* Dont copy */

मी न माझा राहिलो - मराठी कविता (मनमोहन नातू)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी मनमोहन नातू यांची मी न माझा राहिलो ही लोकप्रिय मराठी कविता.

मी न माझा राहिलो - मराठी कविता (मनमोहन नातू)

या नदीला घाट छोटा, बांधुनी मी चाललो


मी न माझा राहिलो - मराठी कविता (मनमोहन नातू)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी मनमोहन नातू यांची मी न माझा राहिलो ही लोकप्रिय मराठी कविता.



या नदीला घाट छोटा
बांधुनी मी चाललो

जन्मली वेदांसवे जी
सिंधु ही सारस्वताची
दे स्मुती आता श्रुतींची
व्यास आणि वाल्मिकींची
मी इच्या पाण्यात रसिका
थेंब म्हणुनी खेळलो

मी नव्हे शिल्पज्ञ मोठा
तंत्र नव्हते माहिती
चार धोंडे जोडणारी
ही किनाऱ्याचीच माती
फक्त तिचा चिखल व्हाया
अंतरी मी ओळलो

या प्रवाहाच्या गतीला
पृथ्वी गाते आरती
जी त्रिकालज्ञास ठेवी
आपुल्या विस्तीर्ण पोटी
ताज बांधो बांधणारा
मी वडारी जाहलो

गर्व कुठला, गर्जनाही
या निवांतातून जाई
ईश्वरी कंठातली का
जाइ कोमेजून जाई
लोटताना देह डोई
मी न माझा राहिलो

- मनमोहन नातू

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची