Loading ...
/* Dont copy */

कोकण - मराठी कविता (रविकिरण पराडकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी रविकिरण पराडकर यांची कोकण ही लोकप्रिय मराठी कविता.

कोकण - मराठी कविता (रविकिरण पराडकर)

चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ


कोकण - मराठी कविता (रविकिरण पराडकर)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी रविकिरण पराडकर यांची कोकण ही लोकप्रिय मराठी कविता.



चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ
तेथील हिरवी गंमत जंमत डोळे भरुनी पाहू
लाल लाल ही माती, इथले डोंगर हिरवे हिरवे
डोईवरती आकाशाने रंग पसरले बरवे
मासोळ्यांचे सूर पाहण्या, होडीमधुनी जाऊ
चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ

वन बांबूचे, रान काजूचे अन आंब्याची राई
नारळ, जांभूळ, फणस गोड हा मेवा देऊनी जाई
झावळ्यातुनी माडांच्या रे चंद्र पसरतो बाहू
चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ

ओढ्यावरती सांकव आहे खाली वाहे पाणी
झाडावरती पक्षी गाती मंजूळ मंजूळ गाणी
शहाळ्यातले पाणी पिऊनी पक्ष्यांसंगे गाऊ
चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ

निळ्या रुपेरी लाटा येती सागर काठावरी
मोर नाचरे काढीत जाती नक्षी वाळूवरी
जिवास वाटे घर कौलारू बांधून तेथे राहू
चला गड्यांनो आपण सारे कोकणात जाऊ

- रविकिरण पराडकर

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची