Loading ...

आपणच आपल्याला - मराठी कविता (अनुराधा पाटील)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री अनुराधा पाटील यांची आपणच आपल्याला ही लोकप्रिय मराठी कविता.

आपणच आपल्याला - मराठी कविता (अनुराधा पाटील)

आपणच आपल्याला लिहलेली, पत्र वाचता वाचता


आपणच आपल्याला - मराठी कविता (अनुराधा पाटील)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवयित्री अनुराधा पाटील यांची आपणच आपल्याला ही लोकप्रिय मराठी कविता.



आपणच आपल्याला लिहलेली
पत्र वाचता वाचता
ओले होणारे डोळे पुसून
फडफडू द्यावित वार्‍यावर पानं
थोडसं हसून आपणच आपल्याला
सांगावी कधीतरी एखादी गोष्ट
आपणच गावं आपल्यासाठी
रिमझिमत्या स्वरांच एखादं गाणं

आपणच जपावेत मनात
वार्‍यावर झुलणारे गवताचे तुरे
एखादी धावणारी पायवाट, अन्
जपावेत काही नसलेले भास

जिथं आपल्यासाठी फुलं उमलतील
अशी जागा सगळ्यांनाच सापडत नाही
मनाच्या कडेनं लावलेल्या झाडांना
आपणच द्यावेत थोडेसे श्वास

- अनुराधा पाटील

अभिप्राय

  1. ही कविता मला बारावीच्या अभ्यासक्रमाला होती. आजही ती तोंडपाठ आहे. आपण या मंचावर ही कविता दिल्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहोत. महाकवयित्री अनुराधा पाटील यांच्या लेखणीला त्रिवार वंदन...

    आपला स्नेही
    -पुंडलिक आंबटकर

    उत्तर द्याहटवा
तुमची टिप्पणी आमच्यासाठी महत्त्वाची आहे!
तुमचा अभिप्राय / टिप्पणी ही आम्ही कसे कार्य करतो? त्यातील सुधारणांसाठी आणि आम्ही सातत्याने उच्च-गुणवत्तेची सेवा प्रदान करतोय की नाही हे समजून घेण्यासाठी आमच्यासाठी महत्वाची आहे.

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची