Loading ...

प्रिय आईस (मराठी कविता)

प्रिय आईस (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी उमेश कुंभार यांची आईच्या कविता यातील प्रिय आईस ही कविता.

प्रिय आईस (मराठी कविता)

प्रिय आईस, तू गायलेल्या ओवींचा आवाज अजूनही कानात घुमतो आहे


प्रिय आईस (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी उमेश कुंभार यांची प्रिय आईस ही कविता.



प्रिय आईस,
तू गायलेल्या ओवींचा आवाज
अजूनही कानात घुमतो आहे
केसांना झालेला मायेचा स्पर्श अजूनही जाणवतो आहे
तुझ्या मांडीवर डोके ठेवून अजूनही निपचित पडावसं वाटतं
पूर्वी तर वेगळंच होतं
पण तुझं ते रागावणं आता हवहवसं वाटतं
बघ ना आई...
दिवस कसे वेगाने गेले
पण आठवणी आगतिकच आहेत
आता तुझी ती ओवी
तुझ्या मांडीवर निपचित पडलेला मी
आणि केसावरून फिरवलेला तुझा मायेचा हात
दुरावल्यासारखा वाटतोय गं
पण तसं नसावं आई
बहुतेक, याला काळ जबाबदार असावा
मलाही वाटतं,
सारे बंध तोडून तुझ्यापाशी यावं
पुन्हा लहानगं व्हावं
पण सारंच आपल्या हाती नसतं आई
ज्या ज्या वेळी मी घरी येतो
तेव्हा मी तूझा लहानगाच बनून येतो
तुझ्यातले बदल मी टिपत असतो
पण सातत्याने एक गोष्ट जाणवते
जग बदललं, दिवस बदलले
दिवसागणिक माणसंही बदलली
पण तू नाहीस
माझ्यासाठी तू अशी आहेस तशीच आहेस
अन्‌ मी लहानच आहे तुझ्यासाठी
प्रत्येक वेळी मी घर सोडून जाताना
आपण जास्त बोलत नाही
तू शांत असतेस
डोळे पाणावलेले असतात
मी मात्र मिश्किलीचं हसणं दाखवत
घर सोडून जातो
दूर दूर जाताना तुझी प्रतिमा
फिकट फिकट होत जाते
आणि त्याच वेगाने माझे डोळे
पाणवत जातात आई


प्रिय आईस (मराठी कविता) संबंधी महत्त्वाचे दुवे:


- उमेश कुंभार

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची