Loading ...

आई कोण असते? (मराठी कविता)

आई कोण असते? (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम च्या सभासद कवयित्री भक्ती रावनंग यांची आई कोण असते? ही कविता.

आई कोण असते? (मराठी कविता)

जी स्वतः जास्त शिकलेली नसताना ही, कसं जगायच याची शिकवण देऊन जाते ती असते आई


आई कोण असते? (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी भक्ती रावनंग यांची कविता ‘आई’.



जी स्वतः जास्त शिकलेली नसताना ही
कसं जगायच याची शिकवण देऊन जाते ती असते
आई

जी नऊ महिने यातना सहन करून
आपल्याला जन्म देते ती असते
आई

जन्मानंतर तर सगळेच आपल्याशी जोडले जातात पण
जन्माआधीपासून जिच्याशी आपली नाळ जोडली गेली असते ती असते
आई

आपण आजारी असताना जी रात्र रात्र
आपल्या शेजारी बसुन काढते ती असते
आई

आपलं मुलं आपल्यापासून दुर असताना जिच्या
मनाची सतत धाकधुक होत असते ती असते
आई

जी आपल्या मुलांच्या सुखासाठी आपलं
काळीज काढून देते ती असते
आई

जी कोणत्याही संकटांची झळ आपल्या
मुलांना लागू देत नाही ती असते
आई

जी स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांना
पोटभर जेवायला घालते ती असते
आई

आपल्या मुलांची सुख दुःख जिला न
सांगताच कळतात ती असते
आई

जी तुमच्या प्रत्येक निर्णयात तुमच्या पाठीशी
भक्कमपणे उभी असतेती असते
आई

जी स्वतःच्या सुखा आधी आपल्या मुलांच्या
सुखाचा विचार करते ती असते
आई

कितीही काही करून तुझे पांग मला फेडता येणार नाही
तुझ्यासाठी तुझ्याएवढं मला काही करताही येणार नाही
कारण तुझे उपकार इतके थोर आहेत की मला काय
या जगात कोणालाच त्याची परतफेड करता येणार नाही

शेवटी एवढेच म्हणेन
हे ईश्वरा, बाकी कोणत्या गोष्टींची शाश्वती नकोय मला
फक्त हीच आई जन्मोजन्मी मिळु दे
हेच मागणे आहे तुला


आई कोण असते? संबंधी महत्त्वाचे दुवे:


- भक्ती रावनंग

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची