Loading ...
/* Dont copy */

तुज करिते औक्षण - मराठी कविता (पद्मा गोळे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी पद्मा गोळे (पद्मावती विष्णू गोळे) यांची तुज करिते औक्षण ही लोकप्रिय मराठी कविता.

तुज करिते औक्षण - मराठी कविता (पद्मा गोळे)

बाळ, चाललासे रणा, घरा बांधिते तोरण


तुज करिते औक्षण - मराठी कविता (पद्मा गोळे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी पद्मा गोळे (पद्मावती विष्णू गोळे) यांची तुज करिते औक्षण ही लोकप्रिय मराठी कविता.



बाळ, चाललासे रणा
घरा बांधिते तोरण
पंचप्राणांच्या ज्योतींनीं
तुज करिते औक्षण

याच विक्रमी बाहुंनी
स्वतंत्रता राखायची
खांद्यावरी या विसावे
शांती उद्याच्या जगाची

म्हणूनिया माझ्या डोळा
नाही थेंबही दुःखाचा
मीहि महाराष्ट्रकन्या
धर्मं जाणते विराचा

नाही एकही हुंदका
मुखावाटे काढणार
मीच लावुनी ठेविली
तुझ्या तलवारीस धार

अशुभाची सावलीहि
नाही पडणार येथे
अरे मीहि सांगते ना
जीजा, लक्षुमीशी नाते

तुझ्या शस्त्रांना, अस्त्रांना
शक्ति देईल भवानी
शिवरायांचे स्वरुप
आठवावे रणांगणी

घन्य करी माझी कूस
येई विजयी होऊन
पुन्हा माझिया हाताने
दूधभात भरवीन

- पद्मा गोळे (पद्मावती विष्णू गोळे)

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची