Loading ...
/* Dont copy */

आईपणाची भीती - मराठी कविता (पद्मा गोळे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी पद्मा गोळे (पद्मावती विष्णू गोळे) यांची आईपणाची भीती ही लोकप्रिय मराठी कविता.

आईपणाची भीती - मराठी कविता (पद्मा गोळे)

आजच्या इतकी आईपणाची, भीती कधीच वाटली नव्हती


आईपणाची भीती - मराठी कविता (पद्मा गोळे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी पद्मा गोळे (पद्मावती विष्णू गोळे) यांची आईपणाची भीती ही लोकप्रिय मराठी कविता.



आजच्या इतकी आईपणाची
भीती कधीच वाटली नव्हती
अगतिकतेची असली खंत
मनात कधीच दाटली नव्हती

विचारलेस आज मला
आई, कोणती वाट धरू?
गोळा झाले कंठी प्राण
आणि डोळे लागले झरू

कोणती दिशा दाखवू तुला?
पूर्व? पश्चिम? दक्षिण? उत्तर?
माझ्यासारख्याच भीतीने या
चारी दिशा झाल्या फत्तर

कोठे ज्ञान, यश, सुख?
काय त्यांच्या खाणाखुणा?
या-त्या रुपात दिसतो
सैतानच वावरतांना

जळी, स्थळी, आकाशीही
अणूबॉम्ब झाकला आहे
प्रत्येक रस्ता माणसाच्या
रक्ताने रे माखला आहे

आज आईच्या कुशीत सुद्धा
उरला नाही बाळ, निवारा
द्रौणीच्या अस्त्रासारखा
हिरोशिमाचा बाधेल वारा

कोठेतरी गेलेच पाहिजे
गतीचीही आहेच सक्ती
जायचे कसे त्याची मात्र
कुणीच सांगत नाही युक्ती

खचू नको, शोध बाळा
तुझा तूच ज्ञानमार्ग
कोणतीही दिशा घे
पण माणुसकीला जाग

धीर धर, उचल पाय
आता मात्र कर घाई
आणखी एक लक्षात ठेव
प्रत्येकालाच असते आई

- पद्मा गोळे (पद्मावती विष्णू गोळे)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची