Loading ...
/* Dont copy */

निज रे लडिवाळा - मराठी कविता (भा. रा. तांबे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी भा. रा. तांबे (भास्कर रामचंद्र तांबे) यांची निज रे लडिवाळा ही लोकप्रिय मराठी कविता.

निज रे लडिवाळा - मराठी कविता (भा. रा. तांबे)

निज माझ्या छकुल्या चिमण्या राजा, निज रे लडिवाळा


निज रे लडिवाळा - मराठी कविता (भा. रा. तांबे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी भा. रा. तांबे (भास्कर रामचंद्र तांबे) यांची निज रे लडिवाळा ही लोकप्रिय मराठी कविता.



जो जो जो जो रे

निज माझ्या छकुल्या चिमण्या राजा
निज रे लडिवाळा
बाळ गुणी, झोप नेली रे कोणी?
जो जो जो बाळा

घरटी ती फांद्यांमधुनी झुलती
निजले चिउकाऊ
निजविती, झुळका गाऊनी गीती
गाणी किती गाऊ

हम्मा ही, दूदू देऊनी पाही
निजली गोठ्यात
रे छबिल्या, राघूमैना निजल्या
अपुल्या पिंजर्‍यात

या वेळीं, निजलीं झाडें वेली;
निजला चांदोबा;
रात्र किती, चढली काळी भवतीं
आला बागुलबा

शुक्क गडे, झाले जिकडे तिकडे
झोप न तुज बाळा
खिंदळशी, खुदुखुदु खुदुखुदु हसशी
एकच हा चाळा

लडिवाळा, रुणुझुण घुंगुरवाळा
पायी वाजविशी
कशी बाळा, झोप शिवेना डोळा?
अफु आली तुजशी

सटवाई, षष्ठिदेवि, जोखाई
सांभाळा याला
न शिवो ते, पाप अमंगल भलते
माझ्या छबिल्याला

- भा. रा. तांबे (भास्कर रामचंद्र तांबे)

अभिप्राय

मराठीतील बोलीभाषा
मराठीतील बोलीभाषा
सर्व पोस्ट लोड केल्या आहेत कोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीत सर्व पहा अधिक वाचा उत्तर द्या उत्तर रद्द करा हटवा द्वारे स्वगृह पाने पाने सर्व पहा तुमच्यासाठी सुचवलेले विभाग संग्रह शोधा सर्व पोस्ट आपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाही स्वगृहाकडे रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार रवी सोम मंगळ बुध गुरु शुक्र शनी जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जाने फेब्रु मार्च एप्रि मे जून जुलै ऑग सप्टें ऑक्टो नोव्हें डिसें आत्ताच १ मिनिटापूर्वी $$1$$ मिनिटांपूर्वी १ तासापूर्वी $$1$$ तासांपूर्वी काल $$1$$ दिवसांपूर्वी $$1$$ आठवड्यांपूर्वी ५ आठवड्यांपेक्षा अधिक पूर्वी अनुयायी अनुसरण करा हे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे १: सामायिक करा २: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड कॉपी करा सर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy विषय सूची