Loading ...

एकटाच चाल - मराठी कविता (ना. घ. देशपांडे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी ना. घ. देशपांडे (नागोराव घनश्याम देशपांडे) यांची एकटाच चाल ही लोकप्रिय मराठी कविता.

एकटाच चाल - मराठी कविता (ना. घ. देशपांडे)

वेगळीच जात तुझी, वेगळाच ताल


एकटाच चाल - मराठी कविता (ना. घ. देशपांडे)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी ना. घ. देशपांडे (नागोराव घनश्याम देशपांडे) यांची एकटाच चाल ही लोकप्रिय मराठी कविता.



वेगळीच जात तुझी, वेगळाच ताल
तू अफाट वाट तुझी, एकटाच चाल

एकटाच चालत जा, दूर दूर दूर
गात गात तूच तुझा, एकटाच सूर

एकटाच चालत जा, उंच आणि खोल
बोल आणि ऐक पुन्हा, तू तुझाच बोल

तू असाच झिंगत जा, विस्मरून पीळ
तू असाच फुंकीत जा, अर्थशून्य शीळ

अंतरात पाहत जा, भास तू तुझेच
शांततेत ऐकत जा, श्वास तू तुझेच

खोल या दरीत अशा, गर्द साऊलीत
हो निमग्न तूच तुझ्या, मंद चाहुलीत

- ना. घ. देशपांडे (नागोराव घनश्याम देशपांडे)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची