Loading ...

ती फुलराणी - मराठी कविता (बालकवी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची ती फुलराणी ही लोकप्रिय मराठी कविता.

ती फुलराणी - मराठी कविता (बालकवी)

हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे


ती फुलराणी - मराठी कविता (बालकवी)

ज्येष्ठ आणि प्रसिद्ध मराठी कवी बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे) यांची ती फुलराणी ही लोकप्रिय मराठी कविता.



हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणाच्या मखमालीचे
त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती
गोड निळ्या वातावरणात अव्याज मने होती डोलत
प्रणयचंचला त्या भ्रूलीला अवगत नव्हत्या कुमारिकेला
आईच्या मांडीवर बसुनी झोके घ्यावे, गावी गाणी
याहुनि ठावे काय तियेला साध्या भोळ्या फुलराणीला

पुरा विनोदी संध्यावात डोलडोलवी हिरवे शेत
तोच एकदा हासत आला चुंबून म्हणे फुलराणीला
छानी माझी सोनुकली ती कुणाकडे गं पाहत होती?
कोण बरे त्या संध्येतून हळुच पाहते डोकावून?
तो रवीकर का गं गोजिरवाणा आवडला अमुच्या राणींना?
लाजलाजली या वचनांनी साधी भोळी ती फुलराणी

आंदोळी संध्येच्या बसुनी झोके झोके घेते रजनी
त्या रजनीचे नेत्र विलोल नभी चमकती ते ग्रहगोल
जादूटोणा त्यांनी केला चैन पडेना फुलराणीला
निजली शेते, निजले रान, निजले प्राणी थोर लहान
अजून जागी फुलराणी ही आज कशी ताळ्यावर नाही?
लागेना डोळ्याशी डोळा काय जाहले फुलराणीला

या कुंजांतुन, त्या कुंजांतुन इवल्याशा या दिवट्या लावुन
मध्यरात्रीच्या निवांत समयी खेळ खेळते वनदेवी ही
त्या देवीला ओव्या सुंदर निर्झर गातो; त्या तालावर
झुलुनि राहिले सगळे रान स्वप्नसंगमी दंग होउन
प्रणयचिंतनी विलिनवृत्ति कुमारिका ही डोलत होती
डुलता डुलता गुंग होउनी स्वप्ने पाही मग फुलराणी

कुणी कुणाला आकाशात प्रणयगायने होते गात
हळुच मागुनी आले कोण कुणी कुणा दे चुंबनदान
प्रणय-खेळ हे पाहुनि चित्ती विरहार्ता फुलराणी होती
तो व्योमीच्या प्रेमदेवता वार्‍यावरती फिरता फिरता
हळूच आल्या उतरुन खाली फुलराणीसह करण्या खेळी
परस्परांना खुणवुनि नयनी त्या वदल्या “ही अमुची राणी”

स्वर्भूमीचा जुळवित हात नाचनाचतो प्रभातवात
खेळूनि दमल्या त्या ग्रहमाला हळुहळु लागति लपावयाला
आकाशीची गभीर शांती मंदमंद ये अवनीवरती
विरू लागले संशय-जाल संपत ये विरहाचा काल
शुभ्र धुक्याचे वस्त्र लेवुनी हर्षनिर्भरा नटली अवनी
स्वप्न-संगमी रंगत होती तरीहि अजुनी फुलराणी ती

तेजोमय नव मंडप केला लख्ख पांढरा दहा दिशाला
जिकडेतिकडे उधळित मोती दिव्य वर्‍हाडी गगनीयेती
लाल सुवर्णी झगे घालुनी हासत हासत आले कोणी
कुणी बांधिला गुलाबी फेटा झकमकणारा सुंदर मोठा
आकाशी चंडोल चालला हा वाङनिश्चय करावयाला
हे थाटाचे लग्न कुणाचे साध्या भोळ्या फुलराणीचे

गाउ लागले मंगलपाठ सृष्टीचे गाणारे भाट
वाजवि सनई मारुतराणा कोकिळ घे तानावर ताना
नाचु लागले भारद्वाज वाजविती निर्झर पखवाज
नवरदेव सोनेरी रवीकर नवरी ही फुलराणी सुंदर
लग्न लागते! सावध सारे सावध पक्षी! सावध वारे!
दवमय हा अंत:पट फिटला भेटे रवीकर फुलराणीला

वधूवरांना दिव्य रवानी कुणी गाइली मंगल गाणी
त्यात कुणीसे गुंफित होते परस्परांचे प्रेम! अहा ते!
आणिक तेथिल वनदेवीही दिव्य आपुल्या उच्छ्वासाही
लिहीत होत्या वातावरणी फुलराणीची गोड कहाणी!
गुंगत-गुंगत कवी त्या ठायी स्फुर्तीसह विहराया जाई
त्याने तर अभिषेकच केला नवगीतांनी फुलराणीला

- बालकवी (त्र्यंबक बापूजी ठोंबरे)

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची