Loading ...

अनन्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

अनन्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या १२ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे.

अनन्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

१२ फेब्रुवारीला प्रवाह पिक्चरवर पाहा अनन्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर


अनन्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर

आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्यात चांगले-वाईट प्रसंग येत असतात. या प्रसंगाचा खंबीरपणे सामना करत आयुष्याकडे नव्या दृष्टीने पहायला हवं हा मोलाचा संदेश देणाऱ्या अनन्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर येत्या १२ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे.



अनन्या ही मध्यमर्गीय कुटुंबातील मुलगी. अतिशय हुशार आणि आयुष्यावर भरभरुन प्रेम करणारी. मात्र अनन्याचं हसतं खेळतं आयुष्य एका अपघाताने पुरतं बदलून जातं. तिला तिचे हात गमवावे लागतात. आपल्या शरीराचा महत्त्वाचा अवयव गमावल्यानंतरही खचून न जाता या परिस्थितीशी अनन्या कसा संघर्ष करते याची प्रेरणादायी गोष्ट सिनेमातून उलगडेल.

लोकप्रिय अभिनेत्री ऋता दुर्गुळेने अनन्या साकारली असून अमेय वाघ, चेतन चिटणीस, ऋचा आपटे, योगेश सोमण, सुव्रत जोशी हे कलाकारही सिनेमात लक्षवेधी भूमिकेत आहेत. सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रताप फड यांनी केलं आहे.

पदार्पणातच प्रवाह पिक्चर वाहिनीला मिळणारा प्रेक्षकांचा प्रतिसाद अभूतपूर्व आहे. पावनखिंड, झिम्मा, चंद्रमुखी, कारखानिसांची वारी, दगडी चाळ २, सरसेनापती हंबीरराव अश्या अनेक सुपरहिट सिनेमांच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर नंतर पाहायला विसरु नका अनन्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार १२ फेब्रुवारीला दुपारी १ वाजता फक्त प्रवाह पिक्चरवर.


अनन्या सिनेमाचा ट्रेलर (व्हिडिओ)





अनन्या सिनेमाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची