Loading ...

फुलवा खामकरचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

फुलवा खामकरचं छोट्या पडद्यावर पुनरागमन - फुलवा खामकरचं छोट्या पडद्यावर पुनरागमन होणार असुन ती कॅप्टनच्या भूमिकेत दिसणार आहे.

फुलवा खामकरचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरचं छोट्या पडद्यावर पुनरागमन


फुलवा खामकरचं छोट्या पडद्यावर पुनरागमन

स्टार प्रवाहचा मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा मध्ये सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकरचं छोट्या पडद्यावर पुनरागमन होणार असुन ती कॅप्टनच्या भूमिकेत दिसणार आहे.



स्टार प्रवाहवर १८ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ या कार्यक्रमाची कमालीची उत्सुकता आहे. ४ ते १४ वयोगटातील बच्चेकंपनीचे ग्रुप डान्स, सोलो डान्स, ड्युएट असे नृत्याचे अनोखे प्रकार या मंचावर पाहायला मिळणार आहेत. सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि हिंदी-मराठी रिऍलिटी शो गाजवणारा नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे या कार्यक्रमाचे कॅप्टन आहेत.

मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा कार्यक्रमाविषयी सांगताना फुलवा म्हणाली, ‘महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहसोबत जोडली जातेय याचा प्रचंड आनंद आहे. खूप वर्षांनंतर पुन्हा एकदा जजची भूमिका पार पाडणार आहे त्यामुळे उत्सुकता आहे. या कार्यक्रमाचं वेगळेपण म्हणजे मी हा शो जज तर करणारच आहे पण सोबतच बच्चेकंपनीसोबत दर आठवड्याला परफॉर्मही करणार आहे. त्यामुळे हा शो म्हणजे प्रेक्षकांसाठी पर्वणी असेल.

अंकुश चौधरीसोबत माझी खूप जुनी ओळख आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वैभव घुगेला पहिल्यांदाच भेटले. या दोघांसोबत काम करताना खूप मजा येतेय. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेलं या मंचावरचं टॅलेण्ट थक्क करणारं आहे. छोट्या दोस्तांचं नृत्यकौशल्य पाहून थक्क व्हायला होतं. त्यामुळे प्रेक्षकांना हा कार्यक्रम नक्की आवडेल याची खात्री आहे.

तेव्हा पाहायला विसरु नका अनोखा कार्यक्रम मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा १८ फेब्रुवारीपासून दर शनिवार रविवार रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’



फुलवा खामकरचं छोट्या पडद्यावर पुनरागमन संबंधी महत्त्वाचे दुवे:


मराठीमाती डॉट कॉम संपादक मंडळ
२००२ । मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादक मंडळाद्वारे विविध विभागांतील साहित्याचे संपादन, पुनर्लेखन आणि संदर्भासहित नवीन लेखन केले जाते.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची