Loading ...

महात्मा होणं सोपं नाही हो - मराठी कविता (आनंद प्रभु)

महात्मा होणं सोपं नाही हो (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी आनंद प्रभु यांची महात्मा होणं सोपं नाही हो ही मराठी कविता.

महात्मा होणं सोपं नाही हो - मराठी कविता (आनंद प्रभु)

चालणार आहे का? थुंकी लावून मोजलेल्या झकपक लाईटात...

महात्मा होणं सोपं नाही हो

आनंद प्रभु (मुंबई, महाराष्ट्र)

चालणार आहे का? थुंकी लावून मोजलेल्या झकपक लाईटात नाचणाऱ्या मुलींवर डान्सबार मध्ये उडवलेल्या कित्तेकाची पडतात पाकिटे रेल्वेच्या संडासात नोटांनी भरलेली बायकांच्या ब्लाऊजात अंडरविअरच्या चोरखिशात सजवून नोटांचा बिछाना त्यावर वेश्या रात्रभर बाहूपाशात चालणार आहे का? महात्मा होणं सोप नाही आहे हो नोट उधळते, दारूच्या गुत्त्यावर जुगाराच्या अड्यावर क्रिकेट कबड्डीच्या सट्यावर कडक नोटेच्या जॅाईंट रोलने दमलावून मारलेल्या बेधूंद सुट्टयावर नोट जाते दान पेटीत तीच खैरातीत नागिन डांस करते दोन हजाराची नोट दारूड्यांच्या तोंडात रामनवमी १४ एप्रिल शिवजयंतीच्या रॅलीत चालणार आहे का? महात्मा होणं सोप नाही आहे हो गांधी तुम्ही जिंकलात कि हरलात माहीत नाही पण तुमच्या आजतागयत झालेल्या अपमानान दंगे भडकवले नाहीत कुणीच धर्मांधांना हत्यारं उचलायला कुठलंच कारण मिळत नाही हो मुळीच पण बहूतेक तुम्ही जिंकलात हत्येनंतर तुमच्या नावानं तरी हिंसा भडकू दिली नाही तुम्ही या महान भारतात म्हणून हे बरोबरच महात्मा होणं सोप नाही आहे हो बाकी थोडफार वाईट बिईट याचंच वाटतं की तुम्हीच खरे सत्याग्रही बाकी सगळे, एक जात सत्तेचे आग्रही

आनंद प्रभु यांचे इतर लेखन वाचा:


मराठीमाती डॉट कॉम येथे प्रकाशित होणाऱ्या निवडक मराठी कविता आता श्राव्य स्वरूपात देखील उपलब्ध आहेत. सर्व ऑडिओ कविता या दुव्यावर ऐकता येतील.



अक्षरमंच - मुक्त व्यासपीठ - नवोदितांच्या लेखन प्रतिभेस प्रोत्साहन देणारे एक मुक्त व्यासपीठ.
आपले लेखन आणि साहित्य प्रकाशित करण्यासाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन मोफत लेखक नोंदणी करा.
नवीन लेखक नोंदणी / मराठीमाती डॉट कॉम येथे साहित्य प्रकाशनासंदर्भातील अधिक माहितीसाठी आम्हाला +९१ ९३२ ६०५ २५५२ येथे संपर्क साधा.

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची