Loading ...

दिवाळीची कविता (मराठी कविता)

दिवाळीची कविता (मराठी कविता) - मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अरविंद थगनारे यांची दिवाळीची कविता ही मराठी कविता.

दिवाळीची कविता (मराठी कविता)

घराभोवती आरास दिव्यांची छान दिवाळीने आणले आनंदास उधान


दिवाळीची कविता (मराठी कविता)

मराठीमाती डॉट कॉम चे सभासद कवी अरविंद थगनारे यांची दिवाळीची कविता ही मराठी कविता.



घराभोवती आरास
दिव्यांची छान
दिवाळीने आणले
आनंदास उधान

अंगणी रांगोळी
रंगांनी सजली
ताईला पाहून
गालातच हसली

बारूदाचे झाड
करी अग्निचा वर्षाव
अग्निबाण आभाळात
पळे भरधाव

तोट्यातले बारूद
कडकड कडाडले
भुईचक्र तर
चक्रावून पडले

इवलीशी टिकली
पिस्तुलात बसली
ऐन दिवाळीत
प्राण सोडली

नाकाला झोंबे
सर्पगोळीचा दर्प
अग्नितून प्रगटला
रक्षेचा सर्प

सुतळीच्या पाशात
बॉम्ब अडकला
दिवाळीच्या मुहूर्तावर
मेघासमान गडगडला

लाल शालू नेसून
फटाकडी नटली
मुलांसवे खेळ खेळता
गतप्राण झाली

राखाडी रंगाची
फुलझडी पुटपुटली
पर्यावरणाची तर
वाट लागली

- अरविंद थगनारे

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची