Loading ...

पालक ब्रेड कबाब (पाककृती)

पालक ब्रेड कबाब, पाककृती - [Palak Bread Kabab, Recipe] तोंडाला पाणी आणणारा, मधल्या वेळेत तसेच शाळेच्या डब्याला देता येणारा पदार्थ पालक ब्रेड कबाब.

पालक ब्रेड कबाब- पाककला | Palak Bread Kabab - Recipe

तोंडाला पाणी आणणारा तसेच स्टार्टर म्हणून खाल्ला जाऊ शकणारा चटपटीत पदार्थ पालक ब्रेड कबाब


पालक ब्रेड कबाब (पाककृती) - (Palak Bread Kabab Recipe) घरातील छोट्या - मोठ्या पार्टीतील स्टार्टर म्हणून पालक ब्रेड कबाब करायला हरकत नाही. चटपटीत असा ‘पालक ब्रेड कबाब’ आपण मधल्या वेळेसाठी किंवा शाळेच्या डब्याला मुलांना एक वेगळा चटाकेदार पदार्थ करून देऊ शकतो.

In a home party we should try Palak Bread Kabab as a Starter. Not only elders but also children also enjoy this Starter. Today we are going to make a mouth-watering Palak Bread Kabab.



पालक ब्रेड कबाब करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • १ वाटी बारीक चिरलेला पालक
  • १ वाटी मुगाची डाळ वाटलेली
  • ६/७ ब्रेड स्लाईस
  • १/२ वाटी बारीक चिरलेला कांदा
  • मिरच्याचे बारीक तुकडे
  • १ चमचा जीरे पावडर
  • चवीनुसार मीठ

पालक ब्रेड कबाब करण्याची पाककृती


  • एका पसरट भांड्यात पाणी घालून ब्रेड भिजवून घ्या.
  • एका कढईत पाणी न घालता पालक शिजवून घ्या.
  • आता एका भांड्यात वाटलेली मुगाची डाळ, कांदा, मिरची, शिजलेला पालक, भिजवून ठेवलेला ब्रेड, जीरे पूड, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकत्रित करून घ्या.
  • सर्व मिश्रण एकत्र करा.
  • मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करून घ्या.
  • तेल गरम करुन तयार गोळे तळून घ्या.
  • तयार आहेत पालक ब्रेड कबाब.
  • पालक ब्रेड कबाब सॉस किंवा चटणी बरोबर खायला द्या.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची