Loading ...

दुधी भोपळ्याचे भरीत (पाककृती)

दुधी भोपळ्याचे भरीत, पाककृती - [Dudhi Bhopalyache Bharit, Recipe] झटपट होणारा, पौष्टिक, चटपटीत आणि महाराष्ट्रीय पदार्थ दुधी भोपळ्याचे भरीत

दुधी भोपळ्याचे भरीत (पाककृती) - पाककला | Dudhi Bhopalyache Bharit - Recipe

झटपट होणारा, पौष्टिक, चटपटीत आणि महाराष्ट्रीय पदार्थ दुधी भोपळ्याचे भरीत


दुधी भोपळ्याचे भरीत (पाककृती) - (Dudhi Bhopalyache Bharit Recipe) दुधी भोपळा जितका पौष्टिक आहे तितकाच तो चवीला जास्त आवडत नाही म्हणून अश्यावेळी मराठमोळा महाराष्ट्रीय पदार्थ, चटपटीत ‘दुधी भोपळ्याचे भरीत’ भाजीला चांगला पर्याय आहे.

Milk Pumpkin is a healthy vegetable. But no one eats much because it has no taste. So today we are going to make this delicious, maharashtrian style Dudhi Bhopalyache Bharit in a quick way.



दुधी भोपळ्याचे भरीत करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • १ मध्यम आकाराचा भोपळा
  • २ मोठे कांदे
  • १ छोटा टोमॅटो
  • ५ - ६ लसूण पाकळ्या
  • २ चमचे शेंगदाणे
  • २ चमचे तेल
  • १ चमचा लाल तिखट
  • आवडीनुसार कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ

दुधी भोपळ्याचे भरीत करण्याची पाककृती


  • सर्वात आधी भोपळा स्वच्छ धुवून कोरडा करावा.
  • मग भोपळ्याला तेल लावून वांगं जसे भाजतो तसे गॅसवर सर्व बाजूने भाजून घ्यावे.
  • थंड झाल्यावर सुरीने काळा झालेला भाग काढावा, पुर्ण काढू नये.
  • काळपट भाग काढून झाल्यावर भोपळा कुस्करून घ्यावा.
  • आता गॅसवर कढई ठेवून त्यात तेल टाकावे आणि शेंगदाणे लालसर भाजून घ्यावेत.
  • शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यात कांदा परतून घ्यावा.
  • त्यामध्ये लसूण, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ टाकून परतून घ्यावे.
  • परतल्यावर त्यात टोमॅटो टाकून मध्यम आचेवर परतून घ्यावे.
  • आता कुस्करलेला भोपळा या मिश्रणात घालून व्यवस्थित परतून घ्यावा व पाच मिनिटे मंद आचेवर झाकून ठेवावे.
  • पाच मिनिटाने गॅस बंद करावा व त्यावर कोथिंबीर पसरावी.
  • तयार आहे झटपट दुधी भोपळ्याचे भरीत.
  • ज्यांना वांग्याचा त्रास होतो त्यांनी दुधी भोपळ्याचे भरीत करून पहावे.
- स्वाती गच्चे

जीवनशैली        पाककला

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची