Loading ...

नागपुरी स्टाईल पाटवडी रस्सा (पाककृती)

नागपुरी स्टाईल पाटवडी रस्सा (पाककृती) - पावसाळ्यात झणझणीत खावा वाटणारा पदार्थ नागपुरी स्टाईल पाटवडी रस्सा [Nagpur Special Patwadi Rassa Recipe].

नागपुरी स्टाईल पाटवडी रस्सा (पाककृती)

पावसाळ्याच्या दिवसात खाता येणारा झणझणीत पदार्थ नागपुरी स्टाईल पाटवडी रस्सा


नागपुरी स्टाईल पाटवडी रस्सा (पाककृती) - (Nagpur Special Patwadi Rassa Recipe) पावसाळा सुरू झाला की गरमागरम, चटपटीत व झणझणीत पदार्थ खाण्यास बनवले जातात. आज आपण असाच एक झणाझणीत पदार्थ ‘नागपुरी स्टाईल पाटवडी रस्सा’ करून करणार आहोत.

When the monsoon starts, hot, spicy and zingy foods are made to be eaten. Today we are going to make a mouth-watering, piquant and spicy Food Nagpur Special Patwadi Rassa.



नागपुरी स्टाईल पाटवडी करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • १ कप बेसन
  • २ - ३ लसूण पाकळ्या
  • १ चमचा मोहरी
  • १ इंच आले
  • १ - २ हिरव्या मिरच्या
  • पाव चमचा हळद
  • १ चमचा तेल
  • १ कप पाणी
  • १ चमचा कोथिंबीर
  • चवीनुसार मीठ

नागपुरी स्टाईल रस्सा व वाटण करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • १ मोठा कांदा
  • २ चमचे किसलेले सुकं खोबरे
  • १ चक्रीफुल
  • २ मोठी वेलची
  • १ तुकडा दालचिनी
  • १ चमचा तीळ
  • १ चमचा खसखस
  • पाव चमचा हळद
  • १ चमचा काश्मिरी मिरची पावडर
  • १ चमचा गरम मसाला
  • हिंग
  • छोटासा गूळाचा तुकडा
  • कोथिंबीर
  • तेल

नागपुरी स्टाईल पाटवडी करण्याची पाककृती


  • आलं - लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घ्या.
  • एका कढईत तेल गरम करून घ्या.
  • तेल गरम झाल्यावर तयार ठेचा घालून परतून घ्या.
  • खमंग परतल्यावर त्यात हळद आणि चवीनुसार मीठ टाका.
  • आता पाणी घालून हलकीशी उकळी काढून घ्या.
  • उकळी आल्यावर त्यात बेसन घाला.
  • बेसन व्यवस्थित मिक्स करा. गुठळी राहू देऊ नका.
  • व्यवस्थित परतल्यावर झाकण ठेवून मंद आचेवर पाच मिनीटे ठेवा.
  • पाच मिनीटाने परतून घ्या व गॅस बंद करा.
  • एका ताटलीला तेल लावा.
  • त्यावर तयार मिश्रण ओता.
  • ताटलीवर गोल किंवा चौकोनी आकारात पसरवून घ्या.
  • चौकोनी किंवा डायमंड आकारात त्याच्या वड्या कापा.
  • तयार आहेत पाटवड्या. याला पातोड्या किंवा बेसन पाटवड्या म्हणतात.

नागपुरी स्टाईल रस्सा व वाटण करण्याची पाककृती


  • सर्वप्रथम वाटण करुन घेऊयात.
  • वाटण करण्यासाठी एका कढईत १ चमचा तेल तापवा.
  • त्यात चिरलेला कांदा लालसर परतून घ्या.
  • थोडा लालसर होत आला की त्यात किसलेले खोबरे टाकून परता.
  • त्यात तीळ, खसखस, सर्व खडे मसाले टाकून व्यवस्थित परतून घ्या.
  • सर्व मिश्रण परतल्यावर थंड करून घ्या.
  • मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
  • आता एका भांड्यात २ चमचे तेल गरम करून घ्या.
  • तेल तापल्यावर वाटण ओता.
  • वाटण तेलात व्यवस्थित परतून घ्या.
  • परतल्यावर त्यात हिंग, हळद, मिरची पावडर, गरम मसाला घालून परतून घ्या.
  • झणझणीत हवा असल्यास कांदा लसूण मसाला किंवा तुमच्या घरातील रोजचा मसाला जास्ती वापरा.
  • वाटणला तेल सुटू लागल्यावर त्यामध्ये पाणी ओता. (कट हवा असल्यास गरम पाणी घालू शकता.)
  • नेहमीच्या रस्स्यापेक्षा थोडंसं घट्ट असा रस्सा बनवा. त्याप्रमाणे पाणी घाला.
  • चांगली २ - ३ मिनीटे उकळी काढा.
  • आता त्यात चवीनुसार मीठ व थोडासा गूळ घालून पुन्हा एक उकळी काढा.
  • उकळी आल्यावर गॅस बंद करा.
  • तयार आहे पाटवडीचा रस्सा.
  • गरमागरम व झणझणीत रस्सा पाटवडीसोबत खाण्यास द्या.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची