Loading ...

खुसखुशीत मुळ्याची कचोरी (पाककृती)

खुसखुशीत मुळ्याची कचोरी, पाककृती - [Mulyachi Kachori, Recipe] मधल्या वेळेत तसेच डब्याला देता येणारा पौष्टिक, चटपटीत पदार्थ खुसखुशीत मुळ्याची कचोरी.

खुसखुशीत मुळ्याची कचोरी- पाककला | Mulyachi Kachori - Recipe

तोंडाला पाणी आणणारी, चटपटीत पदार्थ खुसखुशीत कचोरी


खुसखुशीत मुळ्याची कचोरी (पाककृती) - (Mulyachi Kachori Recipe) आपण मधल्या वेळेसाठी किंवा शाळेच्या डब्याला मुलांना चटपटीत, पौष्टिक पदार्थ ‘खुसखुशीत मुळ्याची कचोरी’ करून देऊ शकतो.

अस्सल भारतील असणारा अत्यंत उग्र वास असणारा मुळा हा वात आणि अपचना सारख्या व्याधिंवर अत्यंत गुणकारी असतो. मुळा ही एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे.

We can provide kids with a quick, nutritious snack for lunch or the school lunch box by making mouth-watering Mulyachi Kachori.



खुसखुशीत मुळ्याची कचोरी करण्यासाठी लागणारा जिन्नस


  • २ वाट्या कणीक
  • १ वाटी डाळीचे पीठ (बेसन)
  • ३ - ४ मुळे
  • १ तुकडा आलं
  • हिरवी मिरची
  • १ चमचा जीरे पावडर
  • तिखट
  • १ चमचा अनारदाना
  • चवीनुसार मीठ

खुसखुशीत मुळ्याची कचोरी करण्याची पाककृती


  • एका परातीत कणीक घ्या.
  • कणकेत डाळीचे पीठ, मीठ घालून कणीक घट्ट भिजवून घ्यावी.
  • मुळा किसून घेऊन त्यातील पाणी काढून टाकावे.
  • त्यामध्ये मिरचीचे तुकडे, जीरे पावडर, तिखट, अनारदाना, आलं व मीठ घालून मिश्रण एकत्र करून घ्यावे.
  • भिजलेल्या कणकेच्या पाऱ्या करून वरील मिश्रण त्यात भरावे.
  • पार्‍या हलक्या हाताने पुरीएवढ्या लाटाव्यात.
  • कढईमध्ये तेल गरम करून तयार कचोऱ्या डीप फ्राय कराव्यात.
  • तयार खुसखुशीत मुळ्याची कचोरी सॉस बरोबर सर्व्ह करावी.



स्वाती खंदारे | Swati Khandare
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.


जीवनशैली        पाककला

अभिप्राय

सर्व पोस्ट लोड केल्या आहेतकोणत्याही पोस्ट आढळल्या नाहीतसर्व पहाअधिक वाचाउत्तर द्याउत्तर रद्द कराहटवाद्वारेस्वगृहपानेपानेसर्व पहातुमच्यासाठी सुचवलेलेविभागसंग्रहशोधासर्व पोस्टआपल्या विनंतीसह कोणतीही पोस्ट जुळणी आढळली नाहीस्वगृहाकडेरविवारसोमवारमंगळवारबुधवारगुरुवारशुक्रवारशनिवाररवीसोममंगळबुधगुरुशुक्रशनीजानेवारीफेब्रुवारीमार्चएप्रिलमेजूनजुलैऑगस्टसप्टेंबरऑक्टोबरनोव्हेंबरडिसेंबरजानेफेब्रुमार्चएप्रिमेजूनजुलैऑगसप्टेंऑक्टोनोव्हेंडिसेंआत्ताच१ मिनिटापूर्वी$$1$$ मिनिटांपूर्वी१ तासापूर्वी$$1$$ तासांपूर्वीकाल$$1$$ दिवसांपूर्वी$$1$$ आठवड्यांपूर्वी५ आठवड्यांपेक्षा जास्त काळापूर्वीअनुयायीअनुसरण कराहे दर्जेदार साहित्य अवरोधीत केले आहे१: सामायिक करा२: सामायिक केलेल्या दुव्यावर क्लिक करून वाचासर्व कोड कॉपी करासर्व कोड कॉपी करासर्व कोड आपल्या क्लिपबोर्डवर कॉपी केला आहेCan not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copyविषयसूची