तिळाची चिक्की
थंडीत खायची तिळाची चक्की अतिशय चवदार आणि लोहयुक्त पदार्थ आहे.
तिळाची चिक्की करण्यासाठी लागणारा जिन्नस
- अर्धी वाटी तीळ
- पाव वाटी गूळ
- दीड चमचा तूप
तिळाची चिक्की करण्याची पाककृती
- तीळ लालसर होईपर्यंत भाजा.
- गार करण्यासाठी बाजूला ठेवा.
- एका थाळीला तळाला तूप लावून ती बाजूला ठेऊन द्या.
- कढईत तूप घेऊन ते गरम करा व त्यात गूळ मिसळा.
- मंद गॅसवर मिश्रण हलवत रहा.
- थंड पाण्यामध्ये या मिश्रणाचा एक थेंब टाकल्यावर त्याची घट्ट गोळी बनेल
- तोपर्यंत मिश्रण गॅसवर ठेवा.
- हे मिश्रण तूप लावलेल्या थाळीत घालून पातळ थापा.
- गार झाल्यावर वड्या पाडा.
तिळाची चिक्की
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला