शिरा - पाककृती

शिरा, पाककला - [Shira, Recipe].
शिरा - पाककृती | Shira - Recipe

शिरा


आपल्या नेहमीच्या शिर्‍यात मूगडाळ रवा घातला असता असा पौष्टिक शिरा तयार होतो.शिरा करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • एक वाटी रवा
 • पाऊण वाटी मूगडाळ रवा
 • दोन ते अडीच वाटी गूळ
 • अर्धी वाटी तूप
 • चार वाट्या पाणी

शिरा करण्याची पाककृती


 • मुगाच्या डाळीचा रवा काढताना डाळ मंद आचेवर थोडी भाजून घ्या व रवा काढून आणा.
 • हा रवा नेहमीच्या रव्याइतका जाड असावा.
 • सर्वप्रथम पातेल्यात तूप घालून त्यावर साधा रवा बदामी रंगावर भाजून घ्या.
 • त्यानंतर लगेच मूगडाळ रवा भाजा.
 • एकीकडे एका पातेल्यात पाणी व गूळ एकत्र करुन उकळत ठेवा.
 • हे पाणी चांगले उकळल्यावर ते भाजलेल्या रव्यामध्ये घाला.
 • झाकण ठेवून शिरा चांगला शिजेपर्यंत वाफ आणा.
 • गुळाऐवजी साखर वापरुनही हा शिरा चांगला होतो.

शिरा

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.