शेवग्याच्या पानांची भाजी - पाककृती

शेवग्याच्या पानांची भाजी, पाककला - [Shevagyachya Pananchi Bhaji, Recipe].
शेवग्याच्या पानांची भाजी - पाककृती | Shevagyachya Pananchi Bhaji - Recipe

शेवग्याच्या पानांची भाजी


शेवग्याच्या पानांमध्ये ‘क’ जीवनसत्व असल्यामुळे जेवणातील लोहाचे पोषण वाढते.शेवग्याच्या पानांची भाजी करण्यासाठी लागणारा जिन्नस


 • दोन वाट्या शेवग्याची कोवळी पाने
 • एक छोटा कांदा
 • एक छोटा टोमॅटो
 • पाच - सहा लसूण पाकळ्या
 • एक किंवा दोन हिरव्या मिरच्या
 • चवीनुसार मीठ

शेवग्याच्या पानांची भाजी करण्यासाठी लागणार्‍या फोडणीचा जिन्नस


 • एक छोटा चमचा जीरे
 • एक छोटा चमचा मोहरी
 • एक मोठा चमचा तेल

शेवग्याच्या पानांची भाजी करण्याची पाककृती


 • प्रथम शेवग्याची पाने स्वच्छ धुवून बारीक चिरा.
 • टोमॅटो, कांदा, मिरच्या आणि लसूण बारीक चिरुन घ्या.
 • कढईमध्ये आवश्यकतेनुसार तेल टाका.
 • तेल गरम झाल्यानंतर जीरे व मोहरीची फोडणी द्या.
 • फोडणीत मिरची व लसूण टाका.
 • मंद आचेवर लसूण तांबूस लाल झाल्यानंतर त्यात कांदा आणि टोमॅटो शिजेपर्यंत परता.
 • त्यात शेवग्याची पाने टाकून हळूहळू परतून घ्या.
 • चवीपुरते मीठ टाका.
 • कढईवर झाकण न ठेवता मंद आचेवर भाजी शिजू द्या.
 • गरमागरम शेवग्याच्या पानांच्या भाजीसोबत गरमागरम भाकरी वाढावी.

शेवग्याच्या पानांची भाजी

स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहासर्व लेखन पहा


जीवनशैली        पाककला

टिप्पणी पोस्ट करा

स्पॅम टिप्पण्या टाळण्यासाठी, सर्व टिप्पण्या प्रदर्शित करण्यापूर्वी नियंत्रित केल्या जातात.