पुदिन्याची चटणी
पुदिन्यांच्या पानांमध्ये ‘क’ जीवनसत्व असते तसेच ही चटणी बनविण्यास सोपीसुद्धा असते.
पुदिन्याची चटणी करण्यासाठी लागणारा जिन्नस
- अर्धी वाटी पुदिन्याची पाने
- अर्धी कैरी किंवा एक टोमॅटो
- अर्धी वाटी कोथिंबीर
- तीन हिरव्या मिरच्या
- पाव वाटी शेंगदाण्याचा कुट
- चार - पाच लसूण पाकळ्या
- छोटा तुकडा आलं
- चवीनुसार मीठ
पुदिन्याची चटणी करण्याची पाककृती
- प्रथम पुदिन्याची पाने व कोथिंबीर बारीक चिरा.
- त्यात किसलेली कैरी किंवा बारीक केलेला टोमॅटो घाला.
- नंतर त्यात शेंगदाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या, लसूण, आले घालून सर्व मिश्रण बारीक होईपर्यंत वाटा.
- तयार चटणीत चवीनुसार मीठ व साखर घाला.
पुदिन्याची चटणी
स्वाती खंदारे
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
संपादिका, मराठीमाती डॉट कॉम । पुणे
संपादकीय, मराठी लेख, फोटो गॅलरी, पाककला, महाराष्ट्र या आणि अशा विविध विभागांत लेखन.
अधिक माहिती पहा । सर्व लेखन पहा
जीवनशैली पाककला